एका कोल्हीने एका सिंहीणीजवळ आपल्या पिलांची खूप स्तुती केली. ती म्हणाली, 'आम्हाला दरवर्षी कितीतरी पोरं होतात, पण आम्ही त्यासंबंधाने कधी गर्व करत नाही. पण काही लोक मात्र एका वेळी एकच पोर जन्मास घालूनही इतरांना तुच्छ लेखतात. हा टोमणा जाणून सिंहीणीने उत्तर दिले, ' बाई, तुम्हाला दर वेळेस खूप मुलं होतात हे खरं, पण तुमच्या मुलांना कोल्हा असं म्हणतात. पण माझ्या एकाच मुलाला मात्र 'सिंह' म्हणतात हे विसरूं नकोस.'
तात्पर्य
- कोणत्याही वस्तूची किंमत ही संख्येवरून नव्हे तर गुणावरून ठरवायची असते. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.