एकदा एका रानमांजराने एक वाघूळ पकडले आणि आता त्याला मारून खाणार तोच ते वाघूळ आपल्याला सोडण्याविषयी विनंती करू लागले. तेव्हा मांजर म्हणाले, 'छे छे, माझ्या हाती आलेल्या पक्ष्याला मी कधी सोडत नाही.'
वाघूळ म्हणाले, 'पण मी पक्षी नाही. जनावर आहे. बघ ना, माझं तोंड उंदरासारखे आहे.' हे ऐकताच मांजराने त्यास सोडून दिले.
नंतर काही दिवसांनी दुसर्या एका रानमांजराच्या हाती ते वाघूळ सापडले. ते मांजर म्हणाले, 'तू उंदरांसारखा दिसतोस, तुला मी कधी ही सोडणार नाही.'
वाघूळ म्हणाले, पण मी उंदीर नाही. पक्षी आहे, हे पहा माझे पंख.'
तात्पर्य
- आपण दोन्ही बाजूंचे आहोत असे दाखविणे कधी कधी फायद्याचे ठरते. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.