एका प्रदेशातील लोकांनी उंट पहिल्यांदाच पाहिला. तेव्हा त्याचे ते विचित्र रूप पाहून ते भिऊन पळून गेले. पण पुढे त्यांना कळले की त्याच्यापासून काही अपाय नाही. हा तर अगदीच गरीब प्राणी आहे. तेव्हा ते त्याला कामासाठी खूप राबवू लागले. त्याच्या पाठीवर मोठमोठी ओझी लादून त्याला उन्हातान्हात दूरदूर हिंडवू लागले.
तात्पर्य
- प्रथमदर्शनी एखाद्या गोष्टीचे माणसाला भय वा कौतुक वाटते पण नंतर मात्र ती गोष्ट त्याला क्षुल्लक वाटू लागते. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.