एका माळ्याचा कुत्रा विहीरीच्या काठी उड्या मारीत असता तोल जाऊन विहीरीत पडला. त्याचे ओरडणे ऐकून माळी त्याला वर काढायला गेला. परंतु तसे करीत असताना तो कुत्रा त्याला चावला. तेव्हा चिडून त्या माळ्याने त्याला विहीरीत तसेच सोडून दिले. त्यामुळे तो कुत्रा बुडून मरण पावला.
तात्पर्य
- कृतघ्न माणूस मरू लागला तरी त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.