एकदा एक धनगराचा मुलगा रानातून लाकडे गोळा करीत असता त्याचा हात चुकून एका सापाला लागला. परंतु, ही गोष्ट चुकून घडली हे लक्षात येऊन, तो साप त्याला चावला नाही. तो त्या मुलाला म्हणाला, 'अरे, पुनः असं कधी करू नकोस. तू मुद्दाम माझ्या वाटेला जाशील तर परिणाम चांगला होणार नाही.'
तात्पर्य
- कोणतेही कृत्य करताना, त्या माणसाचा बरा-वाईट हेतु असेल त्यावरून त्याची पारख करतात. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.