सूर्य आणि वारा यांच्यात आपापल्या पराक्रमाबद्दल एकदा पैज लागली. जवळच्याच एका वाटसरूच्या अंगावरची घोंगडी त्याला काढून ठेवण्यास जो भाग पाडेल तो पराक्रमी समजावा असे ठरले.
प्रथम वार्याने जोराने वाहून ती घोंगडी उडवण्याचा प्रयत्न केला. परंतु वार्यामुळे थंडी वाजून तो वाटसरू ती घोंगडी आणखीनच ओढून धरू लागला. शेवटी वारा दमला, नंतर सूर्याने आपली प्रखर किरणे वाटसरुच्या अंगावर सोडली. उन्हाने त्या माणसाला खूप उकडू लागले. घामाच्या धारा वाहू लागल्या तेव्हा त्याने ती घोंगडी काढून ठेवली व तो सावलीत जाऊन बसला.
तात्पर्य
- नुसत्या शक्तीचा उपयोग नाही. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.