एकदा एका सिंहाच्या मनात आले की, आपण एवढे पराक्रमी व शक्तिमान असून एका यःकश्चित् कोंबड्याच्या आवाजाला घाबरतो ही आपल्याला मान खाली घालायला लावणारी गोष्ट आहे. आपण असे करता कामा नये. असा विचार करीत असतानाच एक मोठा हत्ती कान हालवत त्याच्यापाशी आला. त्याच्या चेहेर्यावरून तो दुःखी दिसत होता. तेव्हा सिंहाने त्याला विचारले, 'मित्रा तू इतका व्याकूळ का दिसतोस ? त्यावर हत्तीने उत्तर दिले, 'अरे, हे दुष्ट चिलट मला मघापासून दंश करतं आहे. त्याने मी त्रासून गेलो आहे.
हे ऐकून सगळ्यांनाच काही ना काहीतरी दुःख लागलेलेच आहे असे सिंहाच्या लक्षात आले.
तात्पर्य
- 'जगी सर्व सुखी असा कोण आहे ?' आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.