एका सुभेदाराचा घोडा खूप देखणा व चपळ होता पण त्यापेक्षा कमी प्रतीचा एक घोडा त्याने विकत घेतला व त्याचे लाड करण्यात व खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात तो बराचवेळ घालवू लागला. एकदा तो घोडा पहिल्या घोड्याला म्हणाला, 'दादा, तू इतका सुंदर व चपळ असताना तुझ्याकडे दुर्लक्ष करून माझेच लाड करण्यात इतका आनंद वाटतो, याचे कारण काय ?' पहिला घोडा म्हणाला, 'कोणतीही वस्तू नवी असली म्हणजे तिची विशेष काळजी घ्यावयाची व थोडी जुनी झाली की तिच्याकडे दुर्लक्ष करायचे हा सर्वसाधारण माणसाचा स्वभाव आहे. आजकाल मालक तुझे लाड करतो पण थोड्याच दिवसात तूही त्याला आवडणार नाहीस व तुझ्या जागी नवा घोडा येईल याबद्दल खात्री असू दे !'

तात्पर्य

- नव्याचे नऊ दिवस !
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel