ऑस्ट्रेलियातील बोन्डी किंवा युकेतील बाऊनमाऊथ बिचवर जसे स्त्रियांना टॉपलेस व्हायला व्हायला परवानगी आहे तसे ब्राझील देशातल्या रिओ दि जनैरोच्या कोपाकबाना बीचवर परवानगी नाही. त्यादिवशी संध्याकाळी सूर्य मावळतीला असतांना कोपाकबाना बीचवर आलेल्या बहुतेक ब्राझीलियन किंवा इतर देशांतील पर्यटक स्त्रियांनी घातलेली बिकिनी ही आकाराने एवढी छोटी आणि तोकडी होती की त्या जवळपास न्यूडच वाटत होत्या. काही जणी पोहोण्यासाठी बिकिनी तर काहीजणी फक्त ऊन खाण्यासाठी नेहमीच्या वापरातील रंगीबेरंगी ब्रा आणि पँटी किंवा फक्त पँटी घालून तेथे आलेल्या होत्या. बहुतेक पुरुष मंडळी ब्रीफ घालून फिरत होते. अनेक स्त्रिया बिनधास्तपणे नियम झुगारून टॉपलेस होऊन फिरत होत्या आणि हे नियम बनवणाऱ्याना सुद्धा माहिती होतेच. या बीचवरील स्त्रियांपैकी अर्ध्या स्त्रिया या बहुतेक करून मॉडेल होत्या आणि असतातच. रिओला दक्षिण अमेरिकेचे पॅरिस म्हणतात ते उगाच नाही. त्या बीचवर नेहमीच या मॉडेल्स येत असतात. कधी कधी येथे सौदर्य स्पर्धा सुद्धा भरते. हॉलीवूड चित्रपटांत दिसणाऱ्या बिकिनीतील सुंदर आणि भरीव शरीरयष्टीच्या अभिनेत्रींपेक्षाही कित्येक पटींनी सुंदर अशा हजारो स्त्रिया अगदी तिथे सहजच दृष्टीस पडत होत्या. स्थानिक पुरुषांच्या दृष्टीला असे उघड उघड मादक सौंदर्य बघणे अंगवळणी पडलेले असते पण भारतात राहणाऱ्या मंडळींना मात्र ते डोळे भरभरून बघतच बसावे असे वाटते.
असेच दोन भारतीय चेहरे काळा कोट, हातात ब्रिफकेस आणि चेहऱ्यावर गॉगल लावून झपाझप चालत किनाऱ्याकडे निघाले होते. बिचवरच्या टॉपलेस मॉडेल्सकडे बघून त्यांचे मन भरत नव्हते. किनाऱ्याजवळ आरामात पहुडलेल्या एका पिळदार शरीरयष्टीच्या माणसाकडे ते आले. तो माणूसही भारतीयच होता. ते दोन जण आल्याचे बघून तो अलर्ट झाला आणि जागेवरून उठून उभा राहिला, त्याने त्या दोघांशी हस्तांदोलन केले.
"हॅलो मिस्टर बाजवा अँड मिस्टर काजवा! केव्हा येणार आहे ती व्हेरोनिका सिसिली?"
"सर साहेब, ती येतच असेल. पंधरा मिनिटात पोचेल ती आपल्याकडे!"
मग ते तिघे जवळच्या चार पैकी तीन खुर्च्यांवर बसले. एक खुर्ची रिकामी होती. ती बहुदा त्या व्हेरोनिकासाठी असावी. तिघेही बराच वेळ बोलत होते आणि त्या बीचवर आलेल्या स्त्री पुरुषांकडे बघत होते.
पाच मिनिटातच व्हेरोनिका समोरच्या गर्दीतून वाट काढत येतांना दिसली. तिने काळ्या रंगाची बिकिनी घातली होती. ती त्या तिघांच्या जवळ आली आणि तिघांनीही तिला उभे राहून शेक हँड केले. त्या तिघांमध्ये बराच वेळ काहीतरी बोलणे झाले आणि मग चौघे जवळच्या आराम खुर्च्यांवर बसले. ते बीचवरच्या स्त्री पुरुषांची लगबग बघत बसले.
व्हेरोनिका मग फोनवर कुणाशीतरी बोलली. ते दोघेजण नंतर निघून गेले. आता तिथे व्हेरोनिका आणि तो "सर साहेब" हे दोघेजण होते. ते दोघे बराच वेळ बोलत होते आणि गर्दीत कुणी त्यांचेकडे बघतय का असा मागोवा घेत होते.
मग, व्हेरोनिकाने सरसाहेबकडे हसून पाहिले, स्वत:ची ब्रा काढून टाकली आणि बाजूच्या एका टेबलावर ठेवली. आता ती संपूर्ण टॉपलेस झाली होती. मग इकडेतिकडे पाहिल्यावर ती सरसाहेबला बाय करून टॉपलेस अवस्थेत त्या बीचवरील गर्दीत निघून गेली. जातांना तिच्या नजरा सावधपणे इकडेतिकडे भिरभिरत होत्या. मग ती गर्दीत दिसेनासी झाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी अटलांटिको पेस्ताना या हॉटेल मध्ये सरसाहेब अंघोळ करून सोफ्यावर कुणाची तरी वाट बघत होता. बाजूला विमानप्रवासासाठी एक बॅग तयार दिसत होती. थोड्याच वेळात बेल वाजली आणि एक अतिशय सुंदर स्त्री आत आली. तिच्याकडे बघून ती युरोपिअन असावी असे वाटत होते. तिचे केस लालसर सोनेरी होते. चेहरा अतिशय बोलका आणि सुंदर होता. तिने हसून सरसाहेबकडे पाहिले. तिच्या हातात एक हँडबॅग होती. ते दोघे इंग्रजीत बोलू लागले.
"शाल वी गो?"
"एस, माय लव्ह! बट व्हेअर इज माय गिफ्ट?"
"गिफ्ट?", तो हसायला लागला, "हे काय! देतो थांब!"
त्याने बाजूला ठेवलेली काळ्या रंगाची ब्रा तिला दिली.
"वाव! मस्त आहे! पण माझ्या आधी तूच माझे गिफ्ट म्हणजे ती नवी कोरी ब्रा उघडून बघितलीस? एवढी घाई?", असे म्हणून तिने त्याचेकडे लाडाने बघितले.
तो डोळे मिचकावत म्हणाला, "मला उत्सुकता होती तू यात कशी दिसशील ते, म्हणून मी तू येण्याआधी थोडी कल्पनाशक्ती लढवत होतो!"
तिने मग तिचा टॉप त्याच्यासमोर काढला. ती आता टॉपलेस होती. त्याने तिला मिठी मारली आणि कुरवाळायला सुरुवात केली.
ती त्याची मिठी सोडवत म्हणाली, "नाही डियर! आता नाही. आता आपल्याला प्रवास करायचा आहे ना! हे आता नंतर! इंडियात गेल्यावर! आता मला तुझी गिफ्ट घालू दे ना!"
मग तो नाईलाजाने बाजूला झाला कारण त्याना लवकरच एयरपोर्टकडे निघणे जरुरी होते. तिने ती काळी ब्रा घातली आणि टॉप चढवला. ते दोघे हॉटेलचे चेकआउटचे सोपस्कार आटोपून निघाले.
थोड्याच वेळात सिक्युरिटी चेक झाल्यानंतर मग त्यांचे "एयर फ्रांस" चे विमान आकाशात उडाले.
भारतात आल्यावर विमानतळावरचा सिक्युरिटी ऑफिसर म्हणाला, "वेलकम टू इंडिया! मिस्टर सूरज सिंग और मिस ऑलिव्हिया ब्रूनर!"