एका मुसलमानाच्या घरी टोपलीत काही कोंबड्या ठेवल्या होत्या. त्यातील एक अगदीच लठ्ठ व एक अगदीच बारीक होती. ती लठ्ठ कोंबडी बारीक कोंबडीची नेहमी चेष्टा करून हिणवीत असे. एकदा त्या मुसलमानाकडे मेजवानी होती. तेव्हा त्याने नोकराला सांगितले की, 'ह्या कोंबड्यात जी लठ्ठ कोंबडी असेल तिला मारून तिची कढी करा.' त्याप्रमाणे नोकर जेव्हा त्या लठ्ठ कोंबडीला मारू लागला तेव्हा ती आपल्याच मनाशी म्हणाली, 'मी जर त्या दुसर्या कोंबडीसारखी बारीक असते, तर आज माझ्यावर हा प्रसंग नक्कीच आला नसता.'
तात्पर्य
- ज्या गोष्टीमुळे माणसाला गर्व येतो तीच गोष्ट दुःखाला पण कारणीभूत होऊ शकते हे विसरू नये. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.