एका आळशी तरुण माणसाला सकाळी दहा वाजेपर्यंत बिछान्यात पडून राहण्याची सवय होती. त्याला एकाने विचारले, 'अरे, तू सकाळी लवकर का उठत नाहीस?' तरुण म्हणाला, 'प्रत्येक दिवशी सकाळी मी पाहतो, तो निरोद्योगिता व उद्योगिता या नावाच्या दोन स्त्रिया माझ्या दोन बाजूला उभ्या असतात. उद्योगिता मला म्हणते, 'उठ अन् कामाला लाग. निरोद्योगिता म्हणते, 'उठू नकोस, असाच पडून रहा.' इतकंच न सांगता त्या आपली मतं समजावून देण्यासाठी लांब लांब भाषण करतात आणि निरनिराळी कारण सांगतात. त्या दोघींची भाषण एखाद्या न्यायाधीशासारखी मी ऐकून घेतो, तोच जेवणाची वेळ होते. मग त्या वेळी मी उठतो !'
तात्पर्य
- आळशी माणूस काम करायला लागू नये म्हणून वाटेल त्या सबबी सांगतो. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.