एक कुत्रा गोठ्यातल्या गव्हाणीत बसला असता तेथे एक भुकेला बैल गवत खायला आला. पण तो कुत्रा त्याला गवत खाऊ देईना. तो त्याच्या अंगावर भुंकू लागला. तेव्हा बैल त्याचा धिक्कार करून त्याला म्हणाला, 'अरे. क्षुद्र प्राण्या, हे गवत तूही खात नाहीस नि मलाही खाऊ देत नाहीस, अशा या दुष्टपणाबद्दल तुला सदा दारिद्र्य येईल.'
तात्पर्य
- काही लोक इतक्या कोत्या मनाचे असतात की एखाद्या वस्तूचा स्वतःला उपयोग नसला तरी दुसर्याला त्याचा उपयोग करू न देता ती अडवून ठेवतात. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.