ब्रूसलीच्या आईचे नाव काय?
माऊ ली...
मोठ्या बहिणीचे नाव काय?
थोर ली...
लहान बहिणीचे नाव काय?
धाक ली...

तुझे काय?
पहिला: हा शर्ट छान दिसतोय.
दुसरा: पण माझा नाही.
पहिला: हा कोटही छान दिसतोय.
दुसरा: पण माझा नाही.
पहिला: मग तुझे काय आहे?
दुसरा: लॉन्ड्री...

शिक्षक : मुलांनो, सांगा बरं गांधीजींनी कठोर परिश्रम, मेहनत करून १५ ऑगस्टला आपल्याला काय मिळवून दिले?
बंड्या : सुट्टी.

मुलगा: बाबा एक शंका विचारू
बाबा: हो विचार
मुलगा: वडील हुशार की मुले हुशार असतात?
बाबा: नक्कीच वडील हुशार असतात.
मुलगा: मग वाफेच्या शक्तीचा शोध जेम्स वॅटच्या वडिलांनी का लावला नाही?

शिक्षक: मी तुला हिमालया संबंधी एवढी माहिती सांगितली.त्याचे फायदेही पटवून दिले. आता तू सांग जर हिमालाय पर्वत नसता तर काय झाले असते?
ज्योती: सर,तुम्हाला इतका वेळ बोलावं लागलं नसतं.

आई: चिंटू,तू आज शाळेत का बरं गेला नाहीस?
चिंटू:अगं आई कालच तर तू म्हणालीस की रोज रोज जाऊन किंमत रहात नाही.

सीता: गीता, तू सहलीला का नाही आलीस गं?
गीता: परत आल्यावर सर निबंध लिहायला सांगतील म्हणून.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel