आशिष अरुण कर्ले.

गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कोपरखैरणे, नवी मुंबई.
९७६५२६२९२६ | ashishkarle101@gmail.com

प्रिस्क्रिप्शनला मराठीमध्ये औषधयोजना म्हणतात. प्रिस्क्रिप्शन हे रुग्णांच्या उपचारासाठी डॉक्टरांनी फार्मसिस्टकडे लिखित स्वरूपात केलेली औषधांची मागणी असते.

हे एक कायदेशीर कागदपत्र आहे.

यामध्ये रुग्णाची सविस्तर माहिती असते. याशिवाय रुग्णालय तसेच डॉक्टरांचा रजिस्टर क्रमांक ही माहितीही यामध्ये नमूद केलेली असते.

प्रिस्क्रिप्शनची सत्यता आणि वैधता तपासण्याचे अधिकार हे फार्मासिस्टकडे असतात.

रुग्णांच्या माहितीमधील काही भाग नमूद करायचा राहिला असेल तर ती माहिती रुग्णाला विचारून फार्मासिस्ट प्रिस्क्रिप्शनमध्ये नमूद करू शकतो.

प्रिस्क्रिप्शन मध्ये औषधाबाबत काही त्रुटी असतील तर त्याबाबत डॉक्टरांशी चर्चा करून फार्मासिस्ट बदल सुचवू शकतो.

रुग्णाची वैयक्तिक माहिती, तारीख, सुपरस्क्रिप्शन, इनस्क्रिप्शन, सबस्क्रिप्शन, उपचारांसाठी डॉक्टरांना परत भेट द्यायची तारीख, signature, डॉक्टरांची स्वाक्षरी आणि रजिस्टर क्रमांक हे प्रिस्क्रिप्शनचे भाग आहेत.

१)रुग्णाची वैयक्तिक माहिती- रुग्णाचे नाव, पत्ता, वय, लिंग, वजन, रक्तगट(माहीत असल्यास), ही माहिती यामध्ये नमूद केलेली असते
२)तारीख- प्रिस्क्रिप्शन लिहिल्याचे तारीख याठिकाणी नमूद केलेली असते. याद्वारे फार्मसिस्टना प्रिस्क्रिप्शनची वैधता तपासण्यात मदत होते.
३)सुपरस्क्रिप्शन- प्रिस्क्रिप्शन मधील Rx हे चिन्ह सुपरस्क्रिप्शन म्हणून ओळखले जाते. हे लॅटिन भाषेतील चिन्ह असून त्याचा अर्थ कृती (रेसिपी) आसा होतो. प्राचीन मान्यतांनुसार रुग्ण लवकर बरा व्हावा म्हणून ईश्वराकडे केलेल्या प्रार्थनेचे प्रतीक असाही याचा अर्थ होतो.
४)इनस्क्रिप्शन- यामध्ये डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधांची माहिती असते. यांच्यात औषधाचे नाव, त्याची क्षमता ही माहिती असते.
५)सबस्क्रिप्शन- या सदराखाली औषध बनवण्याबाबत फार्मासिस्टना सुचना असतात. यातील बऱ्याच संकल्पना या लॅटिन भाषेतील असतात.
६)उपचारांसाठी डॉक्टरांना परत भेट द्यायची तारीख- उपचारांसाठी डॉक्टरांना परत भेट द्यायची तारीख तसेच प्रिस्क्रिप्शन परत खरेदी करणे अथवा काही विशेष सूचना यामध्ये नमूद केलेल्या असतात.
७)signature- यामध्ये औषधवापराबाबत रुग्णांना सूचना असतात. जसे की औषध घ्यायची वेळ,पद्धती इत्यादी.
८)डॉक्टरांची स्वाक्षरी आणि रजिस्टर क्रमांक- यामध्ये डॉक्टरांची स्वाक्षरी आणि रजिस्टर क्रमांक असतो याद्वारे फार्मासिस्ट प्रिस्क्रिप्शनची सत्यता तपासता येते.

प्रिस्क्रिप्शन हे इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेले असते यामधील बऱ्यापैकी माहिती लिहिण्यासाठी लॅटिन भाषेतील चिन्हे आणि संकल्पना वापरल्या जातात.

आजच्या काळात जवळजवळ सर्वच औषधे ही कंपनीमध्ये पूर्वीपासूनच बनवलेली असल्याने प्रिस्क्रिप्शनमध्ये फक्त औषधांच्या कंपनीचे नाव (ब्रँड नेम) अथवा जेनेरिक नाव आणि क्षमता व डोसची संख्या इत्यादि माहिती नमूद केलेली असते.

ई प्रिस्क्रिप्शन- आजच्या डिजिटल युगात ई प्रिस्क्रिप्शनचा वापर वाढताना दिसत आहे. यामध्ये संगणकाच्या माध्यमातून प्रिस्क्रिप्शन लिहिले जाते व ई-मेल च्या माध्यमातून या प्रिस्क्रिप्शनची प्रत फार्मासिस्टकडे पाठवली जाते. ई प्रिस्क्रिप्शनच्या वापरामुळे प्रिस्क्रिप्शनचा गैरवापर कमी होत आहे.

भारतातील मोठमोठ्या शहरात आणि रुग्णालयात ई प्रिस्क्रिप्शनच्या वापरास सुरवात झाली आहे. (डिजिटल इंडिया मोहिमेच्या माध्यमातून येणाऱ्या काळात भारतातील सर्व शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात ई प्रिस्क्रिप्शनचा वापर सुरू होण्याची शक्यता आहे अशा पद्धतीची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही परंतु सर्वच सरकारी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वाढता वापर पाहता भविष्यात या क्षेत्रातही त्याच्या वापराची शक्यता नाकारता येत नाही.)

औषधयोजनेची हाताळणी (हँडलिंग ऑफ प्रिस्क्रिप्शन) हे फार्मसिस्टच्या कौशल्यावर अवलंबून असते. हे विज्ञान आणि कला यांचा सुरेख संगम आहे. यामध्ये औषधाचे वितरण,रुग्ण समुपदेशन, औषध योजनेची नोंद, रुग्ण इतिहासाची नोंद, औषधाचा रुग्णाच्या शरीरावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे या घटकांचा वापर होतो. हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. या विषयावर एक वेगळा लेख लिहीन.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel