मंजुषा सोनार

या लेखात आपण डी मॅट अकाऊंटविषयी माहिती घेऊ. जसे आपण आपले पैसे बँकेत ठेवतो तसेच आपले शेयर्स डी मॅट अकाऊंट मध्ये ठेवतो.

डी मॅट अकाऊंट म्हणजे आपण खरेदी विक्री करत असलेल्या शेयर्सचा हिशेब ठेवणारे अकाऊंट. कोणत्याही बँकेत किंवा शेयर ब्रोकरकडे किंवा सहकारी बँकेत जाऊन  आपल्याला डी मॅट अकाऊंट उघडून मिळते.

यात आपल्याला घेतलेले शेयर्स, IPO मध्ये तुम्हाला allot केले गेलेले (तुमचा वाटा) शेयर्स, खरेदी केलेले शेयर्स, करमुक्त बॉण्ड्स, mutual funds ची युनिट असतात. घेतलेले शेयर क्रेडिट आणि विकलेले डेबिट केले जातात.

या अकाऊंटचे स्टेटमेंट आपल्याला मागणीप्रमाणे दर आठवड्याला, पंधरा दिवसाला किंवा महिन्याला बँक किंवा ब्रोकर पाठवतात. त्याला कॉन्ट्रॅक्ट नोटम्हणतात. या नोट मध्ये आपल्याकडे ज्या कंपन्यांचे शेयर्स असतील त्यांची नावे, त्यांचा आजचा भाव व ते आपण कोणत्या किमतीला घेतले तो भाव असतो. कॉन्ट्रॅक्ट नोट मध्ये सकाळी सव्वा नऊ ते दुपारी साडे तीन या कालावधीत कोणते शेयर घेतले तसेच त्याच दिवसात घेऊन त्याच दिवशी विकले तर सम्पूर्ण दिवसभरात घेतलेले शेयर्स यांची नोंद असते. एका दिवसात एका कॉन्ट्रॅक्ट नोट मध्ये जास्तीत जास्त पाच ते सात इंट्रा डे (त्याच दिवशी घेऊन त्याच दिवशी विकणे) व्यवहार होतात.

तुम्ही दिवसभरात कितीही व्यवहार केले (इंट्रा डे किंवा डिलिव्हरी) तरी एकच कॉन्ट्रॅक्ट नोट मिळते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel