मंजुषा सोनार
जिन्नस:
सात-आठ मिरच्या, मूठभर शेंगदाणे, लसणाच्या चार-पाच पाकळ्या, जिरं, दोन चमचे तेल, कोथिंबीर, मीठ
मार्गदर्शन:
• प्रथम मिरच्या स्वच्छ धुवून बारीक चिराव्यात.
• लसूण पाकळ्या चिराव्यात.
• तव्यावर तेल टाकून, प्रथम शेंगदाणे टाकावेत. नंतर, मिरच्या, लसूण टाकावेत.
• ते भाजले गेल्यावर, ते मिश्रण बाजूला सारून, तव्याच्या मध्यभागी तेल टाकावे. त्यात जिरं व बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी.
• मग ते सगळे मिश्रण एकत्र करावे. जिरं शेवटी टकल्याने ते जळत नाही.
• मग मीठ टाकून त्याला जाडे भरडे ठेचावे.
• हवं असल्यास त्यावर लिंबू पिळू शकतो.
• तोंडी लावायला अगदी चवदार !!
टीप: मिक्सर वापरू नये. ठेचलेलाच छान लागतो.
माहितीचा स्रोत: मी स्वत:
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.