भरत उपासनी
अजून निम्बाचे ते झाड
गावामध्ये तसेच आहे
अजून झोका पारंबीला
मनात माझ्या झुलतो आहे //१//
झाडाच्या त्या समोर आहे
मामाचा तो सुंदर वाडा
पल्याड वाडा अल्याड झोका
मनात माझ्या झुलतो आहे //२//
असो उन्हाळी असो दिवाळी
सुटीत गावी जातो आहे
मावशी,मामा किंवा बन्धू
झोक्यावरती झुलतो आहे //३//
आठवणींचा झोका माझ्या
मनात अजूनी झुलतो आहे
अनंत काळापासून जणू मी
झोक्याव्ररती झुलतो आहे //४//
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.