भरत उपासनी
 
सुटीत जेव्हा राजूला झोप लागते
जादूचे विश्व त्याला दिसू लागते // धृ //

अलीबाबा अलीबाबा आवाज देतो
तिळा तिळा दार उघड मंत्र सांगतो
सोने,माणिक रत्नांची खाण दिसते
जादूचे विश्व त्याला दिसू लागते // १ //

जादूची कांडी फिरवित परी नाचते
चंदेरी सोनेरी पंख तिचे ते
सप्तरंगी,नवरंगी विश्व रंगते
जादूचे विश्व त्याला दिसू लागते // २ //

जादूच्या गोळ्यात कोणी विश्व पहाते
शिंगवाल्या राक्षसाची गर्जना येते
जादूच्या गुहेत मन छान रंगते
जादूचे विश्व त्याला दिसू लागते // ३ //

जादूगार जादूगार गम्मत करतो
जादूच्या टोपीतून ससे काढतो
रिकाम्या डब्यातून मिठाई येते
जादूचे विश्व त्याला दिसू लागते // ४ //

सिंदबाद,बिरबल,टारझन छान
हिमपरी,सात बुटके सारे जमणार
इसापनीती छान गोष्टी सांगते
जादूचे विश्व त्याला दिसू लागते // ५ //

अल्लाउद्दीन घेऊन येतो जादूचा दिवा
जे हवे तुम्हाला ते सारे मिळवा
जादूच्या दिव्यातून सारे मिळते
जादूचे विश्व त्याला दिसू लागते // ६ //

दूध पितो, खाऊ खातो, म्हणतो, मला  वाचू द्या !
नवरंगी गोष्टींचे विश्व सजू द्या
वाचून वाचून थकला की झोप लागते
जादूचे विश्व त्याला दिसू लागते // ७ //

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel