आम्हां हेंचि थोर सद्गुरुविचार । नलगें संप्रधार नानामतें ॥ १ ॥
नेघों ते काबाड न करूं विषम । ब्रह्मांड हें होम आम्हां राम ॥ २ ॥
नेदूं यासि दुःख उन्मनीचें सुख । न करूं हा शोक आला गेला ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे आम्हां सद्गुरु उपदेश । सर्व भूतीं वास हरि असे ॥ ४ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.