- योगिता बनसोडे-भावसार
yogita2007bansode@gmail.com

आज खुप दिवसांनी भेटायचे ठरलं. ती नेहमीप्रमाणे वेळच्या आधी जाऊन पोहचली ती हातामधला मोबाईल चेक करत होती. तेवढयात त्याच्या मेसेजच notification आलं.  wait for 5 min more तिने ok चा Reply दिला. दहा मिनिटाने गाडी पार्क करून तो आला. तिने त्याला लांबून बघून गोड Smile दिली. तो मात्र गंभीरच होता. पडलेला चेहरा, वाढलेली दाढी.पण तिला तो नेहमीप्रमाणे रूबाबदार दिसत होता. खर तिला त्याला सांगायचे होते. Looking nice पण ती काहीच बोलली नाही. तो तिच्याजवळ आला Hi कशी आहेस? ती मी मस्त आणि तु कसा आहेस? त्याने ऐकून न ऐकल्यासारखं करून तिला बोलला चल आत मध्ये बसुन बोलुया.

दोघेही कॉफी कॅफेच्या कोपऱ्यातील टेबलावर जाऊन बसले. ती त्याला न्याहाळत होती. त्याने तिचा Favourite black shirt आणि Blue Jeans घातली होती. तो इकडे तिकडे बघत बोला आज कॅफे मध्ये गर्दी कमी आहे ना? ती बोलली अरे आज weekly day आहे म्हणुन weekend ला खुप गर्दी असते. त्याने मानेनेच हो म्हटलं काय घेणार तु? त्याने तिला विचारलं. तिने उत्तर दिलं तुला त्यानं प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं.

अरे म्हणजे तुला काय पाहिजे ते Order कर. आणि हो खुप झाल. Suspense please आता सांग काय सांगायचं आहे तुला? अंग हो हो एकतर खुप दिवसांनी भेटली आहेस. तुझ्याशी बोलायलाच इकडे आलो आहे. पाहिले आपण Order करूया ती Ok तुझी Favourite cold coffee with ice-cream चालेल. ती अजुन लक्षात आहे तुझ्या तो सांग ना करूया ना Order ती हो.

तो One cold coffee with ice cream and one cafe latte.

ती आता Order करून झालंय. सांग कशाला येथे भेटायला बोलावल आहेस. तो श्वास रोखुन इकडे तिकडे बघुन दबक्या आवाजात आम्ही वेगळ होण्याचा निर्णय घेतला आहे. ती जोरात ओरडून काय? बरा आहेस ना तु? अग हो हो मी जे सांगतो आहे तेच खर आहे. तिला काय बोलावं ते सुचलचं नाही तीने थोड Panic होऊन विचारल का पण? अचानक काय झाल? तु असाच आहेस थोडस Adjust करायच. तो अंग ही ही हा आमच्या दोघांचा Decision आहे. आम्ही mutual understanding मध्ये  घेतला आहे. अरे पण असं कसं. तो तु जरा शांत हो. ऐक मी काय सांगतो ते मला कोणासोबत तरी share करायच होतं. म्हणून मी तुला सांगितल Plz मला समजुन घे. खरं तर तिला बोलायच होत असं नको करूस. पण ती फक्त Ok बोलली. तु ठीक आहेस ना. तो Don't worry मी ठीक आहे. चल निघुया का? मी तुला Drop करतो हो चल. ती गाडीमध्ये जाऊन बसली. नेहमीप्रमाणे ती बोलत नव्हती. खरंतर दोघेजण खुप शांत होते. उत्तरा मॅडम तुमचं घर आल ती गाडीतुन उतरून चल बाय गुड नाईट TC पोहचलास की Msg कर. ती थोडीशी अस्वस्थ होती. तिच्या मनात प्रश्नांचा काहूर होता.

अगं प्रिया किती उश्ीार. तेवढयात छोटी आकांक्षा धावत येऊन बिलगली मम्मा कुठे होतीास मी तुला किती Miss केलं माहिती आहे का तुला. हो बच्चा मी पण तुला खुप Miss केलं. प्रियाची आई चल प्रिया पटकन फ्रेश हो. आपण पटकन जेवण करून घेवुया. आई मला भुक नाही आहे गं. अस काय करतेस आधी सांगायचं ना. आकांक्षाला तरी भरवुन घे. तुझी वाट बघत बसली आहे. रात्रीच सगळ आवरून. प्रिया बेडवर पडली होती. आकाक्षा तिच्या कुशीत झोपली. तिन यश ला Msg केला पोहचलास का? त्याचा Reply हो कधीच ती Msg नाही करता येत का? तो Sorry अग विसरलो. ती its ok झोप आता gn तो gn बाय.

प्रिया स्वत:शीच पुटपुटत होती एवढं सोप नाही. वेगळ होण. याला कुणी काय बोलणार नाही पण? प्रश्न विचारणारे कमी आहेत का? माझ्याशिवाय कोणाला कळणार. हिलाच नवराने सोडली असेल. अशीच आहे? बाहेर लफड असेल हिच. भेटला असेल पैसेवाला. शी शी नको ते ते. हे सगळ ऐकाव लागत. पण बंधनात राहून. नरक यातना सहन करण्यापेक्षा बरं आहे. प्रियाच लग्न सात वर्षापूर्वी विक्रांत चांदेकरशी झालं होत. खरंतर विक्रांत तिच्या मैत्रीणीचा मित्र त्याने प्रियाला लग्नासाठी विचारलं प्रियाने विचार केला काय वाईट आहे. दिसायला देखणा आहे. स्वत:चा बिजनेस आहे. आणि माझ ज्याच्यावर प्र्रेम होत तो कुठे आहे काय माहिती. प्रियाने विक्रांतला होकार दिला. दिड वर्षाच्या रिलेशनशिपनंतर प्रियाने विक्रांत सोबत लग्न केल. लग्नानंतर लगेचच आकाक्षांचा जन्म झाला. प्रियामध्ये विक्रांतमध्ये अधुन मधुन खटके उडायचे. पण प्रिया गोष्टी सोडुन देत होती. एक दिवस अचानक तिला यश देसाई नावाची Friend request आली. ती पुटपुटली जा तुला add च नाही करणार? तिने यशचा profile पाहिला Current location लंडन अरे वा. असं बोलुन तिने add केल थोडयावेळाने तिला Messenger वर एक Msg आला Hi Madam कशा आहात? प्रिया मी मस्त तु कुठे आहेस आणि आता आठवण आली माझी? आठवण तर रोज येते. पण आता काय तुझ लग्न झालं आहे. आता तु aunty झाली आहेस. हा हा हा. प्रिया. गप्प बस रे तु. स्वत: बघ uncle दिसतोस

यश -    हो का

प्रिया    -    हो

यश    -    ऐक ना मी next week मध्ये भारतात येतो. बघ तुला जमणार असेल तर आपण भेटुया

प्रिया    -    न जमायला काय झालं मला फक्त एक दिवस आधी सांग.

यश    -    Ok bye

प्रिया जवळ जवळ आठ वर्षानंतर यशला भेटणार होती. ती खुप excited होती. आज बराच वेळ स्वत:ला आरशात न्याहाळत होती. विक्रम आज काय Imp Client मिटिंग आहे का नाही बऱ्याच वेळ रेडी होत आहेस म्हणुन विचारलं. प्रिया अरे हो आज खुप महत्वाची client मिटींग आहे. प्रियाने छान पिंक रंगाची कुर्ती आणि सफेद रंगाचा लेगीन्स घातला होता. त्याच्यावर छान मॅचिंग लोबणारे कानातले आणि गुलाबी रंगाची लिपस्टीक एका हातामध्ये ब्रेसलेट आणि दुसऱ्या हातामध्ये घडयाळ घातलं. ती आज छानच दिसत होती. अगदी पहिल्यासारखी फक्त थोडीशी हेल्थी झाली होती.

यश नेहमीप्रमाणे छान casual's मध्ये आला छान ग्रे रंगाचा टि शर्ट आहे Black Jeans हातामध्ये छान Branded घडयाळ.

यश -    Hi, How R U    

प्रिया    -    Hi I am fine

अस बोलण सुरू झालं जवळ जवळ दोनतीन तास कधी उलटून गेले त्यांना कळालय नाही. प्रियाने मोबाईल चेक केला. विक्रांतचे पंधरा मिस कॉल. तिने विक्रांतला कॉल केला त्याने तो कट केला. तिला समजल त्याला राग आला आहे.

प्रियाने घाईने पर्स घेतली चल बाय निघते खुप उशीर झाला आहे. यश अग थांब मी Drop करतो. ती नको मी cab बुक केली आहे. bye

प्रिया घरात येताच विक्रांतने तिच्या हातातला मोबाईल खेचुन घेतला व बोलला मोबाईलचा वापर कसा कसावा अजुन तुला माहिती नाही का? आणि तिचा मोबाईल जमिनीवर फेकुन दिला. याच्यापुढे लक्षात ठेव. कसा वापरायचा ते. खरंतर प्रियासाठी हे सर्व नवीन नव्हत तिने मोबाईल उचलला बॅटरी नीट केली. पण मोबाईल. काय start होत नव्हता. तिने फोन चार्जिंग साठी लावला. तेव्हा कुठे दोन तासांनी मोबाईल सुरू झाला. यश एका पाठोपाठ एक Msg पोहचलीस का घरी? काही Problem तर नाही ना? खरच खुप छान वाटलं एवढया वर्षानी भेटून. प्रियाने Reply केला same here गुड नाईट बाय.

आता रोजच गुड मॉर्निंग आणि गुड नाईट चे Msges यश आणि प्रिया करत होते. अधुन मधुन भेटत पण होते. एकदिवस सकाळी यशला प्रियाचा Msg आला. माझ्याकडे दोनच पर्याय आहेत. एकतर suicide किंवा Divorce यशला खरंच खुप shock बसला. काय झाल आहे प्रिया सांग ना.

प्रिया -    Msg वर  नको तु मला भेटू शकतोस?

यश    -    हो नक्की, अर्धा तासात भेटुया

खरंतर यशला काहीच कळत नव्हत नक्की काय झालं. प्रिया आली तिच्या डोळयाकडे काळा निळा, डाग दिसत होता. हाताला पण लागलं होतं. यश बघताच तिने मीठी मारली. रडू लागली यश. अग काय झालं सांगना Please कोणी केल?

आधी बस पाणी पि.

प्रिया पाणी प्यायली नंतर बोलु लागली यश मी खुप चुकीच्या माणसावर प्रेम केलं आणि लग्नही? तो मला रोज मारतो त्याच्या आयुष्यात कोणतीही वाईट घटना घडली की त्याचं खापर माझ्यावर फोडतो. मी फक्त आकांक्षामुळे गेली दोन वर्ष सगळ सहन करत आहे. पण आता सहन नाही होत. यश-ठिक आहे पण suicide हे काय Solution नाही आहे. आकाक्षांचा विचार कर. दोन वर्षापासुन का सहन करत आहेस. तुझ्या घरच्यांना सांग ना. त्याची मदत घे. आणि मी आहे तुझ्या बरोबर Don't Worry-

प्रियाने घरच्यांच्या आणि यशच्या मदतीने वेगळ होण्याचा निर्णय घेतला आता ती आकांक्षा आणि तिची आई एकत्र राहतात.

प्रियाला अजुनही तो दिवस आठवतो. जेव्हा यशने तिला सिद्धी चा फोटो दाखविला होता. सिद्धी दिसायला सुंदर गोरीपान, भुऱ्या रंगाचे डोळे, रेखीव नाक, उंची साधारण 5.3 इंच यशपेक्षा कमी होती. पण दोघेही अगदी cute couple वाटायचे. सिद्धी fashion Designer होती. सिद्धी कारखानीस.

काहीही करून यशला आणि सिद्धीला वेगळं नाही होऊ दयायचं अस प्रियाने ठरवलं. दुसऱ्यच दिवशी तिने यशला फोन केला मला भेटायचं आहे तुला? यश का? please मला काही discuss नाही करायच आहे. प्रिया ठिक आहे. याच्यापुढे मला फोन किवा Msg नको करूस. बाय अग प्रिया अस काय करतेस. ठिक आहे. उदया भेटतो मी तुला ok बाय.

प्रिया- काय हे यश तु काय विक्रांत आहेस का? तुझ्यामध्ये किती समजुतदारपणा आहे. तु किती स्त्रियांना Respect देतोस. आणि हे काय?

यश- झालं बोलुन मी काही विक्रांत नाही आहे मान्य. पण ती पण प्रिया नाही आहे समजुन घ्यायला.

प्रिया- म्हणजे?

यश - तुला असं वाटतं मी खुप समजुतदार किंवा Gentleman आहे. पण तिला अस वाटत नाही. माझ तिच्यावर प्रेम नाही आहे. ती माझ्यासाठी Imp नाही आहे. असच तिला वाटतं? आता दरवेळेस मी तिला माझे तिच्यावर किती प्रेम आहे हे सांगत फिरणार नाही. दरवेळी मी नाही proof करू शकत. एकतर मला व्यक्त होता नाही येत तुला माहिती आहे ना. please मी तुला request करतो आता नको discussion please.

प्रिया - अरे पण?

यश - Please    

प्रिया     - ok baba your happy ना i am also happy

पुढील सहा महिन्यातच सिद्धीचा आणि यश divorce झाला. यश आता पुर्ण पणे स्वत:ला कामामध्ये झोकून देत होता.

यश -हॅलो प्रिया

प्रिया- हा बोल

यश    - ऐक ना मला तुझी help हवी आहे. मला investments कराची आहे.

प्रिया-अरे हो नक्की help करेन. चांगले returns मिळतील असेच plan देईन तुला.

प्रिया एका MMC बँकामध्ये investment advisor म्हणुन काम करत होती आता यश आणि प्रिया एकत्र वेळ घालवू लागले. त्याच्या professionally कामांसाठी. यश प्रियावर impress होता. त्याला हव्या तशा investments तीने करून दिल्या होत्या.

एक दिवस दोघेजण बाहेर जातांना रस्त्यात गाडी बंद पडली.

प्रिया-शी हिला पण आताच बंद पडायचं होता का?

यश - it's ok मी बघतो काय झालं ते.

अचानक पाऊस सुरू झाला. यश धावत येऊन गाडीत बसला. प्रिया त्याच डोक ओढणीने पुसत होती. यश तिच्याकडे बघत होता. आज पहिल्यांदा तो तिला इतक्या जवळुन बघत होता. बघता बघता दोघेजण एकमेकांच्या मिठीत स्थिरावले.

यशने घरी पोहचताच प्रियाला sorry चा Msg पाठवला.

प्रिया - its ok plz तु sorry नको बोलुस.

पण त्या दिवसापासून दोघांच नातं बदलल होत. एकदा यशने तिला विचारलं प्रिया आता पुढे काय?

प्रिया मला पुढे जाण्याची भिती वाटते.

यश-ठीक आहे जशी तुझी इच्छा.

प्रिया खुप खुश होती. यशचा 37वा वाढदिवस होता. 27 सप्टेंबर तिने यशला छान surprise दयायच ठरवलं. रात्री 11 वाजता प्रियाच्या आईने यशला फोन केला. प्रियाची तब्येत ठीक नाही. आहे. लवकर या. यश आज घरी एकटाच होता. आई बाबा आणि त्याची बहीण गावी गेले होते. यशने गाडी काढली आणि प्रियाच्या घरी पोहचताच दरवाजाची त्याने बेल वाजवली. कुणीतरी दार उघडला पण संपुर्ण रूम मध्ये अंधार होता. यशने light switch on करताच समोर त्याचे आई, बाबा, बहीण त्याचे बालवाडीपासुन त आतापर्यंतचे सर्व मित्र मैत्रिणीनी. सर्वजण एका सुरात ओरडत होते. Happy Birthday dear Yash. अचानक सिद्धी त्याच्यासमोर आली. तिने यशला मिटी मारली व बोलली Happy Birth day dear आणि प्रियाकडे बघत बोलली She understands you more... never leave her तेवढयात प्रिया आली त्याला मिठी मारली व बोलली Happy Birthday यश खरंतर खुप भारावुन गेला होता. समोरच्या भिंतीवर यशचे लहानपणापासुनचे ते आतापर्यंतचे फोटो-त्याच्या आवडत्या म्हणजे Tom & Jerry कार्टूनचा केक. त्याच्या आयुष्यातल्या सगळया महत्वाच्या व्यक्ती हजर होत्या. तो खुप खुश होता.

पार्टी संपल्यावर त्याने प्रियाने मिठी मारली व बोलला thanks for everything.

प्रिया बोलली पण अजुन एक surprise बाकी आहे?

यश     - आता अजुन काय?

प्रिया    - आधी डोळे बंद कर

यश     - अग पण

प्रिया    - यश

यश     - OK

यश डोळे बंद करून उभा होता.

प्रिया आली.

आता उघड डोळे. यशने पाहिले प्रियाच्या हातात एक चॉकलेट केक होता त्याच्यावर लिहिले होते. Will you marry me प्रिया गुडघ्यावर बसली तिने एक अंगठी काढली व बोलली will you marry me, please यशला काही बोलावे तेच सुचेना त्याने अंगठी घेतली आणि प्रियाला मिठी मारली. प्रिया बोलली मला माहिती आहे हे तुला कधी आयुष्यात जमणार नाही. म्हणुन मिच विचारलं. यश तिला मिठीत घेवुन yes dear I Love you. I Love you.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel