उठोनि ब्राम्हीं मुहूर्ती । चिंतन करावी गुरुमूर्ती ॥
भवपाशा होईल शांती । स्वानंदस्थिती निजबोधें ॥१॥
सगुण निर्गुण ध्यान । एकाग्र करावें चिंतन ॥
आत्माराम परिपूर्ण । सुख निधान स्वानंदें ॥२॥
बरवीं पादतळीं लक्षुनी । ध्वज अंकुश वज्रादि चिन्हें ॥
पद्म उर्ध्व रेखा चरणीं । चिदघनीं विराजित ॥३॥
ऐसी पादपद्मा पासुनी । अययवमस्तक पर्यंत मनीं ॥
ध्यावी गुरुमूर्ती अनुदिनीं । आनंदखनी शोभतसे ॥४॥
वरदहस्त मस्तकीं धरुनी । कृपां आठवावी मनीं ॥
उपाधी निरसुनी । ब्रम्हानंदीं सुख व्हावें ॥५॥
पिंडा ब्रम्हांडाचा नाश । करुनि व्हावें पै निर्दोष ॥
हेचि गुरुकृपा विशेष । श्रीगुरुभक्त शोभती ॥६॥
गुरु नाम गुरु ध्यान । गुरु परब्रम्हा निधान ॥
गुरू परिपूर्ण चिद‌घन । श्रीगुरु राम विराजित ॥७॥
ऐशा निदिध्यासें करुनी । मनोनाश होय चिदघनीं ॥
मग कृतकृत्य हौनी । साक्षात्कारीं असावें ॥८॥
निर्गुण निर्विकार । अनिर्वाच्य सुखसार ॥
जीवन्मुक्त पैलपार । श्रीगुरुभक्त शोभती ॥९॥
स्वयें प्रसन्न श्रीगुरुराज । आनंदमूर्ती पादरज ॥
रूळे अखंड सहज । कृतकृत्य पै झाले ॥१०॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to श्रीआनंद - चरितामृत