नित्य उठोनि प्रात:काळीं । श्रीगुरुचरणांबुज आकळी ॥
भव - पाशा झाली होळी । स्वानंदस्थिती निजबोधें ॥१॥
घ्यावा गुरुराज अंतरीं । पादद्वय धरुनी शिरीं ॥
आपाद पूजेचे कुसरीं । चित्तवृत्ती निमग्न ॥२॥
झाला ज्ञानाचा प्रकाश । विपरीत ज्ञाना झाला नाश ॥
भेटे श्रीगुरू परिस । ब्रम्हानंद कोंदाटे ॥३॥
सद्‌गुरुराज चिंतामणी । कामधेनूचीं दुभणीं ॥
कल्पवृक्ष फळती मनीं । मनांतील सुखसिद्धी ॥४॥
सद्‌गुरुराज गुणातीत । हेचि वरद पै निश्चित ॥
आनंद राम - शरणागत । कृतकृत्य पै झाला ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel