निलेश मधुकर लासुरकार
मेघ दाटले होते मग
बेधुंद बरसल्या सरी
श्रावण सरींची बरसात
आज पाहिली खरी
हा मनमोहक निसर्ग
झुळुझुळु वाहती नदी
जाणवते थंड हवेची झुळूक
पाळी ऊन तर पाऊस कधी
ही मान डोलावती झुडुपे
हिरवा शालू पांघरली धरती
फूलांनी बहरलेल्या वेली
त्यावर फुलपाखरे भिरभिरती
हरखला नववधूंचा शृंगार
आनंदी सणवारांचे दिन
पवित्र धाग्याचे बंधन
आपुले संस्कृती दर्शन
दर एक महिन्यात हीच
स्वर्गसम धरती पाहू दे
श्रावण सरींची बरसात
अशीच कायम राहू दे...
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.