डॉ.ऋतुजा विजय वेळासकर
(आयुर्वेदाचार्य) 9892473648
hashtagmindthoughts.blogspot.com

दीपावलीची आपण सर्वच जण खूप आतुरतेने वाट .पाहत असतो , दीपावली म्हटले की डोळ्यासमोर लगेच आकाशकंदील , दिवे , फटाके व फराळ उभा राहतो ..

दिवाळीतील सगळ्यांची सर्वात  आवडीची गोष्ट म्हणजे ' अभ्यंग स्नान ' अर्थातच संपूर्ण अंगाला सुगंधी उटणे लावणे .

आयुर्वेदा नुसार अभ्यंग करण्याचे अनेक फायदे सांगीतले आहेत .

1 उटणे हे त्वचेवर लावल्याने वर्ण सुधारतो, त्वचा मऊ सर होते , पोत सुधारण्यास मदत होते त्याच सोबत सुरकुत्या येत नाहीत
2 दीवाळी नंतर सुरू होणाऱ्या थंडीत त्वचा फुटणे , कोरडी होणे , खाज येणे ह्या गोष्टी होत नाहीत.
3 नित्य अभ्यंग केल्याने म्हातारपण उशीरा येते असे आयुर्वेदात वर्णिली आहे .

अभ्यंग करतना सम्पूर्ण अंगाला तीळ तेल कोमट करून लावावे वा नंतर  उटणे लावून आंघोळ करावी .

तीळ तेल हे हाडांचे आरोग्य जपण्यासाठी मदत करते व हाडांना बळकटी देते .

अभ्यंग स्नान नंतर नरकसुराचा वध हा  कारेटे फोडून केला जातो.

कारेटे फोडल्या वर त्यातील आतला रस हा थोडया प्रमाणात चाखला जातो .

कारेट्याचा रस हा कडू असतो , जी गोष्ट कडू रसची असते ती आपल्या पोटाला सर्वात चांगली असते ..

कडू रस हे पचनचे  उत्तम कार्य करते व दीवाळी मधे फराळ व इतर मिष्ठान्न हे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते व त्याचा त्रास होऊ नये ह्याचे काम कडू रस करते .

बरेचदा दिवाळी मधे अपचन , पोटात जळजळ व गसेस ची तक्रार जाणवते अश्या वेळेस दिवस भर दोन ते तीन वेळ अर्धा चमचा जीरे व खडीसाखर खावी म्हणजे वरील त्रास होत नाही व रात्री झोपताना भिजवलेल्या काळ्या मनुका खाव्यात म्हणजे पोट साफ होण्यास मदत होते.

फटाक्यांचे धूर , तेलकट खाणे अश्यामुळे चेहऱ्यावर खाज व पुरळ येते , ह्या साठी नित्य ताजे कोरफड  गर व आंघोळीच्या पाण्यात कडुनिंबाची पाने टाकावी व दिवसभरात चेहरा साध्या पाण्याने धुवावा.

केस मुलायम व काळेभोर राहण्यासाठी केसांना खोबरेल तेलात मेथी दाणे, कोरफड गर टाकून ते तेल लावावे, केस धुण्यासाठी शिकेकाई व रीठा चूर्ण वापरावे .

अश्या प्रकारे दिवाळी मध्ये वरील प्रमाणे काळजी घेतल्यास दिवाळी आणखीन आरोग्यमय व आनंदाची जाईल .

शुभ दीपावली

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel