आम्ही विठ्ठलाचे दूत । यम आणूं शरणागत ॥१॥

हातो हातीं वाजवूं टाळी । करुं पातकांची होळी ॥२॥

करुं कथा हरिकीर्तन । तोडूं यमाचें बंधन ॥३॥

तुका म्हणे बळी । जन्मा आलों भूमंडळीं ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel