आपुलेसें कांहीं । येथें सांगिजेसें नाहीं ॥१॥

परी वाणी वायाचळे । छंद करवी बरळे ॥२॥

पंचभूतांचा हा मेळा । देह सत्यत्वें निराळा ॥३॥

तुका म्हणे भुली । हिच्या उफराटया चाली ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel