जाउनियां सांगा विठ्ठलासी कोणी । माझी चिंतवणी करा कांहीं ॥१॥

दुरोनियां आलों मजलीचे चाली । तेणें हे कष्टली काया माझी ॥२॥

अनंता जन्मींचा अंगीं आहे शीण । तो हा उतरीन तुझे पायीं ॥३॥

तुका म्हणे आतां चरण दाखवीं । अदृष्टासी लावीं पायधुळी ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel