'Citizenship, they will answer invelves duties no less than rights. It involves in particular the duty of living decently in conformity with the standard of the white man. Experience in South Africa Shows that the Indian is not prepared  to do this. He is disposed to live in his store, actually sleeping, in some cases, in close contact with the articles of food which he prepares to sell for consumation next day. Such habits revolt the white man. Inspection cannot stop such evils. Best  way is to keep the Indian out. Prevention is better than cure.' अर्थातच या सर्व अडचणी गोरे लोक पुढे आणतील म्हणून गोखले या मार्गाने गेले नाहीत. But  Mr. Gokhale - to his  credit be it said- is to wise to use such arguments. गोखल्यांनी जरी या गोष्टी पुढे आणू दिल्या नाहीत तरी मॉर्निंग पोस्ट त्या सत्य आहेत असे ठासून सांगत आहे व त्यावर उपायही सुचवीत आहे. गोखल्यांनी एकच गोष्ट पुढे मांडली ती ही की, साम्राज्याचा हिंदुस्तान हा महत्त्वाचा घटक आहे. हिंदुस्तानात राष्ट्रीय जागृती व ऐक्य भावना उत्पन्न झाल्या आहेत. जर हिंदू लोकांस येथे सर्वत्र मज्जाव होईल तर हिंदुस्तान बिथरेल. आणखी दुसरी गोष्ट, आता हिंदुस्तानातच नवीन कारखाने निघत असल्यामुळे तेथे जास्त मजूर लागतात. आणि हिंदुस्तानात मजुरांस मजुरी मिळू लागल्यावर इकडे येणारा प्रवाह आपोआप बंद होईल; अर्थात हिंदी  लोकांमुळे आपला देश गजबजून जाईल ही भीती निराधार आहे हे त्यांना त्यांस पटविले. ज्या अर्थी नवीन लोक फार येणार नाहीत, त्या अर्थी जे सध्या आहेत त्यांस योग्य व रास्त हक्क देण्यास कोणती अडचण आहे असा गोखल्यांनी सवाल टाकला. गोखल्यांचे हे सर्व करणे मुत्सद्दीपणास शोभेसे होते यात शंका नाही. मॉर्निंग पोस्ट म्हणते :- "Mr. Gokhale has succeeded in proving to the people of this country that the Indian problem cannot  be regarded  purely from the local  point of view. His sketch of the awakening of national consciousness in the East has come as a revelation of those who  have hither- to turned deaf ears to the far- off murmur and stir of that awakening. India says Mr. Gokhale, is herself crying for labour.'' अशा युक्तिवादाने गोखल्यांनी आपल्या देशबांधवांची बाजू नीट सावरून धरली. त्यांचे म्हणणे शांतपणे सर्वांनी ऐकले. त्यांनी सर्वांसच राजीखुषी करण्याचे काम केले नाही. स्वाभिमान व सद्सद्विचारबुध्दी जागृत ठेवून त्यांनी चोखपणाने आपले काम केले. त्यांच्याविषयी एक ठिकाणी असे उद्गार निघाले - 'Truly a public man who wishes to obey the voice of his conscience alone, has a difficult, if not an impossible task before him, if he wishes also to please all people.' I langa lase Natal  हे वृत्तपत्र १५ नोव्हेंबरच्या अंकात म्हणते- "Mr. Gokhale has received the attention of our European section of the community not so much  because of his personal ability- which is undoubted- as because of his position as an acknowledge spokesman and representative of the whole of the races in India, Those, who do not speak are, like  the absent, usually forgotten. Those, who speak with authority, like Mr. Gokhale are always heard.''  हिंदुस्तानचा प्रमुख पुढारी, सकल जनतेचा विश्वासपात्र असा नेता अशा दृष्टीने त्यांच्याकडे  तिकडील लोकांनी पाहिले. त्यांनी देशाची शिष्टाई शक्य तितकी समतोलपणे केली आणि नंतर इतर कामांसाठी ते माघारी वळले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel