नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी ( जन्म: सप्टेंबर १७, इ.स. १९५०) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मे २६, इ.स. २०१४ पासून स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. ते ऑक्टोबर ७, इ.स. २००१ पासून मे २२, इ.स. २०१४ पर्यंत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. भाजपच्या गुजरात विधानसभा २००२ ते २०१२ तसेच १९९५ व १९९८ निवडणूक विजयांमध्ये मोदींचे मोठे योगदान होते. ते २००१ च्या ऑक्टोबर मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले व त्यानंतर सरळ ४ विधानसभा जिंकत मोदींनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार पाहिला. २००९ लोकसभा निवडणुकीसाठीही ते भाजपचे कूटनीतीज्ञ होते.

Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel