विडा घ्याहो अंबाबाई । जगज्जननी माझे आई ।
विनवितो दास प्रेमें ॥ हस्त जोडुनी आई ॥ धृ. ॥
त्रिगुणपूगीफळ । चूर्ण केलें निर्मळ ॥
निर्गुण केशराने ॥ रंगविलें सोज्वळ ॥ विडा. ॥
प्रपंच पक्व पानें । हाती घेउनि विवेकाने ।
द्वैतभाव जाळूनिया ।वर लावला चूना ॥ विडा. ॥ २ ॥
भावार्थ शुभ्रकार । प्रेमलवंग त्यांत ॥
सुवासिक सर्व द्रव्यें ॥मेळविलीं समस्त ॥ विडा. ॥ ३ ॥
जय जय कुळदेवते ।आदिशक्ती मूळमाते ॥
घेउनि विडा हाती ।हरी तुज विनवीत ॥ विडा घ्याहो. ॥ ४ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel