महिषासुरमर्दिनि देवि त्रिपुरसुंदरी ।
ओवाळिन पंचारति घेउनी करी ॥ धृ. ॥
रत्नजडित सिंहासनिं नित्य बैससी ।
दीप्तीने लाजविले भास्कर शशी ॥
अष्टभुजा देवी तुज पूजुं भक्तिसी ॥
देई । येई । पाही । सुखसदने ।
मृगनयने शशिवदने ॥
पाव झडकरी ॥ १ ॥
मारुनिया चंडमुंड देव रक्षिसी ।
अवतरुनी भूमिवरी भक्त तारिसी ॥
ओवाळित वासुदेव प्रार्थितो तमीं ॥
शक्ते । माते । ललिते भयहरणे । सुखकरणे । शिवरमणे मुक्त मज करीं ॥
महिषासुरमर्दिनी ॥ २ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel