श्रीगणेशायनमः ॥ श्रीमत्कल्पतोदभूतायमुनागिरीगव्हरे ॥ श्रुताकरोतिसुखीनंदर्शनात्सेवन्नाकि ॥१॥

कथासांगतेशंकर ॥ महापराक्रमीभयंकर ॥ निसुंदरनामेंनिशाचर ॥ देवीनेंजेव्हांमारिलें ॥२॥

तेव्हांहयग्रीवनिशाचर ॥ रथारूढहोऊनसत्वर ॥ पातलादेवीच्यासमोर ॥ जोपूर्वीगुप्तझालाहोता ॥३॥

तोचिप्रगटहोऊनीयुद्धासी ॥ करावयाइच्छाधरोनीमानसीं ॥ आलाअसेऐसेत्यासी ॥ जगदंबेनेंपाहिलें ॥४॥

देवीनेंउड्डाणकरोनीआकाशीं ॥ वरुणपाशेंबांधिलेंत्यासी ॥ सुटुंपाहेपरीसामर्थ्यज्यासी ॥ नाहींराहिलेंकिंचित ॥५॥

अर्धचंद्राकारघेऊनशर ॥ देवीनेंछेदिलेंत्याचेंशिर ॥ ज्वलितकुंडलेंदिसेंसुंदर ॥ धरणीवरीपडियलें ॥६॥

कबंधपडलें एकीकडे ॥ मस्तकपडिलेंदुसरीकडे ॥ प्राणरहितपडिलेंमढें ॥ हयग्रीवराक्षसाचें ॥७॥

हेंपाहुनसुरगण ॥ आनंदपावलेपरिपूर्ण ॥ जयजयकारेंकरितेस्तवन ॥ जगदंबेचेंतेकाळीं ॥८॥

देवपुष्पवृष्टीकरिती ॥ हर्षेंअप्सरानाचती ॥ सुस्वरेंगंर्धवगाती ॥ जयघोषकरितीवाद्यांचा ॥९॥

हयग्रीवनिसुंभराक्षसदोनी ॥ जगदंबेनेंमारिलेंरणी ॥ हेमातंगराक्षसेंपाहुनी ॥ देवीसीवचनबोलत ॥१०॥

कायत्वांपराक्रमकेलानिश्चित ॥ कपटेंमारिलेसैन्यासमस्त ॥ मजपुढेंअभिमानधरीसीबहुत ॥ स्वकीयबळाचातुंदेवी ॥११॥

कपत्सोडोनीहोयस्थिर ॥ मनींधरोनियाधीर ॥ तुजरुचेलतरीसमर ॥ मजसीकरीयेवेळीं ॥१२॥

तरीमीतीक्ष्णबाणेंकरुन ॥ यारणांततुजमारीन ॥ ऐकोनमातंगाचेंवचन ॥ हांसुनबोलतजगदंबा ॥१३॥

हसावयाकायकारण ॥ समजलेंपाहिजेश्रोतयापूर्ण ॥ निंदातिरस्कारसत्कारस्तवन ॥ देहाअभिमानानेंघडतसे ॥१४॥

आपणेदहात्मा होऊन ॥ दुजासंदेहात्ममानुन ॥ करुंलाअगेनिंदास्तवन ॥ प्रसंगपाहुनीअज्ञानी ॥१५॥

गुणांचेठांयीं दोषारोप ॥ करुनिमूढकरितजिल्प ॥ निष्कपटाअसतांकपटारोप ॥ करोनराक्षसबडबडला ॥१६॥

अंबापूर्णचैतन्यघन ॥ तेथेंकैंचादेहाभिमान ॥ शत्रुमिउत्रसमसमान ॥ दयाघनसर्वदा ॥१७॥

मातंगासीमारुन ॥ छेदावयाचादेहाभिमान ॥ मगतोकरावापावन ॥ हास्यकरीतयास्तव ॥१८॥

अंबाम्हणेमातंगाप्रती ॥ तूंतरीनिर्बळअल्पमती ॥ तुजसींयुद्धमीनिश्चिती ॥ करणारनाहींपापिया ॥१९॥

मदंगा पासुनएकशक्ति ॥ निर्माणहोईलतीतुजप्रती ॥ युद्धकरुनतुजलाअंतीं ॥ मारूनटाकोलनिश्चयें ॥२०॥

स्कंदम्हणेऋषीप्रती ॥ तेव्हांऐसेंबोलूनभगवती ॥ स्वशरीरापासोनएकशक्ति ॥ प्रगटकरीधवां ॥२१॥

तो राक्षसजंवपाहत ॥ शक्तिप्रगटलीअदभुत ॥ द्विभुजाप्रचंडमुखीदिसत ॥ गजारुढझालीअसे ॥२२॥

धनुष्यबाणघेतलेकरी ॥ भयंकरदिसेसर्वापरीं ॥ गंभीरनादमेघापरी ॥ प्रचंडअट्टहासकरीतसे ॥२३॥

वस्त्रनेसलीआरक्तवर्ण ॥ तैसेंचउत्तरीयवसन ॥ आरक्तसर्वांगभूषण ॥ आरक्तनयनशोभती ॥२४॥

आरक्तनखेंओष्ठआरक्त ॥ आरक्तमाळाकंठींधारित ॥ वारुणीमदेनेंत्रधुणींत ॥ मदमत्ताअकृतीदिसतसे ॥२५॥

भयंकरभूतेंपरिवारित ॥ मातंगराक्षसावरीधांवत ॥ पांचतीक्ष्णबाणानें त्वरिता ॥ प्रहारकीतमांतगासी ॥२६॥

सवेंचीमारिलेंअश्वासी ॥ सारथीघाडिलायमसदनासी ॥ दुर्दशापातलीमातंगासी ॥ बाणविद्धकेलाशक्तिनें ॥२७॥

अन्यरथांतझडकरी ॥ बैसोनी कोपेंत्याअवसरीं ॥ नऊबाणकौमारीवरी ॥ सोडिताझालाराक्षस ॥२८॥

पंचवीसबाणेवैष्णवीसी ॥ आठबाणेंत्वरितांदेवासी ॥ तीनबाणेंशक्तिसी ॥ विद्धकेलेंराक्षसें ॥२९॥

दहाबाणेंब्रह्माणीसी ॥ साठबाणेंमाहेंद्रिसी ॥ सत्तरबाणेंनारसिंहासी ॥ वाराहिसीपांचबाणें ॥३०॥

पांचपांचबाणेंकरुन ॥ पृथकपृथकयोगिनीसीजाण ॥ विंधिताचीकोपलीदारुण ॥ शक्तितुरजादेवीची ॥३१॥

मगवीसबाणकाढुन ॥ त्यांचेवक्षस्थळलक्षुन ॥ ताडितांचीराक्षसजाण ॥ पतनपावलमहीवरी ॥३२॥

पतनपावतांचराक्षसेश्वर ॥ तेव्हांमातृकागणसत्वर ॥ सैन्यामारुनीकरितीचुर ॥ राक्षसाचेंतेकाळीं ॥३३॥

ब्राह्मीहंसारुढहोऊन ॥ जिकडेतिकडेराक्षससैन्य ॥ तिकडेकुशोदकअभिमंत्रुन ॥ जलक्षेपनकरितसे ॥३४॥

तेंजलबिंदुजेथेंपडती ॥ त्याचेतात्काळअस्त्रेंहोती ॥ राक्षसांचाघातकरिती ॥ गतप्राणहोती तेधवां ॥३५॥

माहेशअरीत्रिशुलमारुन ॥ राक्षसांचाघेतसेप्राण ॥ कौमारीशक्तिस्वशस्त्रेकरुन ॥ घेतसेप्राणराक्षसांचा ॥३६॥

वैष्णवीनिजशस्त्रेंकरुन ॥ हीराक्षसांचेंकरीहनन ॥ नारसिंहीविदारुन ॥ तीक्ष्णनखानेंकरितसे ॥३७॥

वाराहीकरुनीतुंडप्रहार ॥ राक्षसादाखवीयमाचेंनगर ॥ ऐंद्रीकरुनीवज्रप्रहार ॥ चूर्णकरीतराक्षसासी ॥३८॥

ऐसामातृकागनानेंसमस्त ॥ राक्षसाचाकेलानिःपात ॥ मतंगराक्षसहोतामूर्च्छित ॥ तोसावधहोउनीपाहतसे ॥३९॥

आपलें सर्वराक्षससैन्य ॥ नष्टझालेंतावलोकून ॥ कोपेम्कडकडाओठचाऊन ॥ शक्तिसीबोलततेकाळीं ॥४०॥

हेदेवीतुझ्यामातृगणांनीं ॥ माझेसैन्यटाकिलेंमारुनी ॥ ही त्वाबरीचकेलीकरणी ॥ प्रतिबंधमाझादुरझाला ॥४१॥

ऐसाबोलिलाभनंतगराक्षस ॥ येथेंसंशयेईलश्रोतियांस ॥ नाशहोतासैन्यास ॥ प्रतिबंधगेलाकैसासाम्हणे ॥४२॥

सैन्यबळज्यासीबहुत ॥ त्यासीजयमिळेरणांत ॥ याचेउत्तराऐकोननिश्चित ॥ दत्तचित्तहोउनी ॥४३॥

जोनिधडाआहेशुर॥ त्यासीसहायनकोणीइतर ॥ सैन्यरक्षुनीशत्रुसंहार ॥ कारावालागतोम्हणोनी ॥४४॥

दोहीकडेचित्तधावतां ॥ शत्रुसीअवसरफावेघाता ॥ याअभिप्रायेंतत्वतां ॥ मतंगबोललादेवीसी ॥४५॥

सैन्याचावधत्वांकेला ॥ तेणेंअंतरायमाझागेला ॥ आतांमजसीसंग्रामाला ॥ उभीराहेमजपुढें ॥४६॥

कोठेंजाशीलपळोन ॥ नदीसेजावयादुसरेंस्थान ॥ राक्षसाचेंबोलऐकुन ॥ देवीवचनबोलत ॥४७॥

मुढाकायबोलसीव्यर्थ ॥ शुरतोबोलूननाहींदाखवीत ॥ करुनीमिरवितीपुरुषार्थ ॥ समरंगनामाझारी ॥४८॥

सर्वराक्षसांसमक्षजाणा ॥ आतांचतुजलामीमारीन ॥ ऐसेंबोलूनशुलतीक्ष्ण ॥ हातींघेऊनीदेवींनें ॥४९॥

कोपेंराक्षसाच्याहृदयावरी ॥ वेगेंशुलप्रहारकरी ॥ तंवतोराक्षसतनुझडकरी ॥ टाकोनीभुजंगरुपझाला ॥५०॥

जैसाकाप्रळयानळ तीक्ष्णजिव्हाखंगकेवळ ॥ ओठचाऊनटाकोगरळ ॥ विषाग्रीच्यातेधवां ॥५१॥

देवीनिंगरुडास्त्रे करुन ॥ दृढकेलेंत्यासीबंधन ॥ तेव्हांसर्परूपसोडुन ॥ उन्मत्तगजरूपधरियलें ॥५२॥

सोंडेनेंअंबुगणचारी ॥ वृष्टीकरोनीदेवीवरी ॥ धरुंपाहेतंवझडकरी ॥ गंडस्थळींताडिलादेवीनें ॥५३॥

मस्तकफूटोनीपापीत्वरति ॥ भूमीवरीपावलामृर्च्छित ॥ गजरुपसोडोनक्षणांत ॥ पुन्हांराक्षसरुपझाला ॥५४॥

खंगचर्मघेऊननित्वारित ॥ देवीच्यागजासीप्रहारकरित ॥ तवदेवीनेखंगासहित ॥ हाततोडिलाराक्षसाचा ॥५५॥

गदाघेऊनिडाव्याहातांत ॥ देवीसीमारावयाधांवत ॥ गदेसहितडावाहात ॥ देवींनेंतोडिलातत्क्षणीं ॥५६॥

तथापितोराक्षसअदभुत ॥ पादघातेंताडूंपाहात ॥ देवीनेंदोन्हीपायत्वरीतें ॥ अर्धचंद्रशस्त्रेछेंदिलें ॥५७॥

पायतोडतांचसत्वर ॥ करपादरहितशरीर ॥ शस्त्रप्रहारवेगानेंअंबर ॥ प्रदेशींकिंचितउडालें ॥५८॥

पडलेंनाहींभूमीवर ॥ तितक्यांतदेवीनेत्यांचेंशिर ॥ शस्त्रेंछेदुनिभुमीवर ॥ पाडलेंसत्वरराक्षसाचें ॥५९॥

ऐसामतंगराक्षसेश्वर ॥ अतुलपराक्रममहाउग्र ॥ सहतुकडेहोऊन शरीर ॥ भूमीवरीपडिलीजेधवां ॥६०॥

तेधवांत्यांचेंउरलेंसैन्य ॥ तेंहीभयपीडीतहोऊन ॥ दिशेसीगेलेंपळून ॥ प्राणरक्षणकरावया ॥६१॥

देवऋषीगणाआनंदले ॥ पुष्पवृष्टीकरितेझाले ॥ देववाद्येंवाजवूंलागलें ॥ नाचूंलागलेअप्सरागण ॥६२॥

गंधर्वपतिगाऊलागले ॥ मुनीगण अत्यंतस्तविते झाले ॥ जयजयकारेंगर्जोलागले ॥ सुखीझालेसर्वही ॥६३॥

पुण्यवायुवाहतप्रांजळ ॥ मंदसुंगधसुशीतळ ॥ धूळीशमोनीधरणीतळ ॥ स्थिरझालेंतेधवां ॥६४॥

मार्गवाहिनीझाल्यासरिता ॥ दिशानिर्मळझाल्यासमस्ता ॥ रोगरहितात्काळतत्वतां ॥ चराचरसर्वहीविश्वझालें ॥६५॥

स्वर्गवासीवारंवार ॥ स्तवितेझालेनिरंतर ॥ होऊनीआनंदनिर्भर ॥ उत्साहगजरकरतेझालें ॥६६॥

ऐसीगजवाहिनीदेवीशक्ति ॥ मारुनिमतंगराक्षसाप्रती ॥ मातृकासहितपातलीनिश्चिती ॥ त्वरितीदेवीसन्निध ॥६७॥

स्वशक्तिईनेमतंगमारिला ॥ हेंपाहुनतुरजामंगला ॥ विस्मयेंबोलेसर्वदेवाला ॥ मुनीगणमातृकागणासी ॥६८॥

माझ्याशक्तीनेंराक्षसमारिला ॥ तरीसुचकनामअसावेंइजला ॥ ऐसेंवोलोनमगशक्तीला ॥ बोलतीझालीजगदंबा ॥६९॥

त्वामातंगराक्षसमारिलासी ॥ तरीमातंगीनामासोतुजसी ॥ प्रसिद्धकळौसकळलोकांशीं ॥ सातंगीनामतुजगातील ॥७०॥

भूलोकींमनुष्यदूःखपीडित ॥ तुजहोतीलशरणांगत ॥ तेटाकुनीदुःख दोषाप्रत ॥ परमगतीसीपावतील ॥७१॥

चैत्रमासींशुद्धअष्टमीसी ॥ शुचिर्भूतनिय तमानसीं ॥ रात्रींकरतीलतुझेपूजेसी ॥ मनोरथत्यांचेपुरतील ॥७२॥

मूळनक्षत्रींतुझेंदर्शन ॥ जेसद्भ विंघेतीलजाण ॥ त्याचीगृहबाधाहोयशमन ॥ राक्षसपीडानहोय ॥७३॥

रोगनहायत्यालागुने ॥ बालवैधव्यदोषदहन ॥ बालस्त्रीसुखावहपूर्ण ॥ दर्शनतुझेंमांतगी ॥७४॥

तुझेदर्शनाचेंपूण्यअधिक ॥ कोटीयज्ञफलदायक ॥ नवरात्रनिराहरकरुनिदेख ॥ बलीदानकरीलजो ॥७५॥

नानाभक्षयुक्तनैवेद्य ॥ अधिकारपरत्वेंमांसमद्य ॥ हरिद्रागोरोचनादिविविध ॥ धूपदीपमनोरम ॥७६॥

ऐसीयाप्रकारेंपूजाविधी ॥ करीलत्यासीतात्काळसिद्धि ॥ प्राप्तहोईलनिरवधी ॥ माझ्याअनुग्रहेंकरुनी ॥७७॥

ऐसेंतुरजावरदेऊन ॥ मातंगीसहपरिवारघेऊन ॥ स्वस्थळासीपावलीजाण ॥ भक्तरक्षणकरावया ॥७८॥

पांडुरंगजनार्दन देवीचरणींअनन्यशरण ॥ पुढीलकथेंचेंनिरूपण ॥ तिच्याकृपेनेंकरील ॥७९॥

इतिश्रीस्कंदपुराणे सह्याद्रीखंडे ॥ तुरजामहात्म्ये ॥ शंकरवारिष्ठसंवादे ॥ मातंगीचारित्रनाम ॥ षोडशोध्यायः ॥१६॥

श्रीजंगदबार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel