श्रीगणेशायनमः ॥ जयतुळजापुरनिवासिनी ॥ सात्विकदेवजयदायिनी ॥ वेदाब्राह्मणाप्रतिपाळुनी ॥ रक्षणकरिसेस्वधर्माचें ॥१॥

ऐसींतुंपरमेश्वरी ॥ भुवनजननीभुवनसुंदरी ॥ तुझीलीलअगाधवैखरी ॥ वर्णितांनसरेकल्पांतीं ॥२॥

तुझेंचरित्रपरमपावन ॥ वदवीमाझेंवदनीराहुन ॥ भावेम्करितोसांष्टांगनमन ॥ अंबेतुझ्याचरणांसी ॥३॥

श्रोतेऐकासावधान ॥ पुर्वकथानुसंधान ॥ विरोपाक्षबोलेवचन ॥ म्हणेयमसीउभीराहे ॥४॥

तुंयमसयंमिनीपती ॥ महाबाहुवीरविख्याती ॥ माझेंसैन्यनाशिलेंनिश्चिती ॥ पराक्रमबहुतदाखविला ॥५॥

माझ्याअग्रभागींनीट ॥ स्थिरराहेतरीधीटे ॥ महाबुद्धीतुंचोखट ॥ पराक्रमदावीआपुला ॥६॥

स्कंदम्हणेऋषीप्रत ॥ सेनापतीचेंबोलणेंत्वरित ॥ ऐकोनीयमकोपयुक्त ॥ विरुपाक्षावरीआपुला ॥७॥

धगधगीताअठबाण ॥ ह्रुदयीलक्षुनिसोडलेंतीक्ष्णातेणेंतोव्यथापावुन ॥ नेत्रगरागराफिरवीत ॥८॥

क्षणैकझालामूर्छापन्न ॥ सवेम्चसावधहोऊन ॥ दुरव्यथेसीकरुन ॥ कोपायमानबहुतझाला ॥९॥

शक्तिघेऊनहातांत ॥ नेटेयमासीहाणीत ॥ यमेंदंडघातेंत्वरित ॥ शक्तिसीतोडुनटाकिलें ॥१०॥

शक्तिनासलीपाहुन ॥ सवेंचीदानवेंशुलघेऊन ॥ यमाचेंहृदयींमारुन ॥ व्यथितकेलेंयमासी ॥११॥

व्यथेनेंव्याकुळहोऊन ॥ तात्काळव्यथेचेंझालेंनिरसन ॥ कालंदंडहातींवेऊनशमन ॥ कोपायमानबहुझाला ॥१२॥

विरुपाक्षाचेंहृदयलक्षुन ॥ दंडेताडणकरितांचजाण ॥ विरुपाक्षांचेंहृदयफुटुन ॥ रथांतुनपडिलाभुमीवरी ॥१३॥

विरूपाक्षपावलापतन ॥ त्याचेंसैन्यटाकिलेंमारुन ॥\ सेनापतिपडलाहेंपाहुन ॥ धावोनीआलादैत्यपती ॥१४॥

यमाच्याहृदयींतिक्ष्णबाण ॥ दैत्यपतीनेंमारिताचजाण ॥ यमाभिन्नहृदयहोऊन ॥ मूर्छितपडलाभूमीवरी ॥१५॥

यममूर्छितझालापाहुन ॥ तात्काळधांवलाहुताशन ॥ शक्तिनेंदैत्यासीताडून ॥ चतुरंगसेनाजाळीतसे ॥१६॥

वाद्येंसकळझालीनष्ट ॥ वर्मनद्धवीरहोतीदग्धस्पष्ट ॥ तात्काळरथबहुतश्रेष्ठ ॥ जाळूनटाकिलेअग्नीनें ॥१७॥

वायुअनुकुल झालाअग्नीसी ॥ तेणेंतोपेटलाचौपासी ॥ अग्नीजाळीतसेस्वसैन्यासी ॥ पाहुनियांदैत्यराजे ॥१८॥

धारासुरेंघेऊनीगदेसी ॥ तात्काळताडिलेंअगीसी ॥ तोमहावीरदेवसैन्येसी ॥ विदारितकरीतबाणानें ॥१९॥

कुबेरासीयुद्धीजिंकुन ॥ नैऋतीजिंकलानलगताक्षण ॥ वायुचंद्रमजिंकुन ॥ सुर्यवसुद्रजिंकलें ॥२०॥

अश्विनौदेवाविश्वदेव ॥ साध्यपितृगणजिंकिलेसर्व ॥ यक्षगणजिंकलेनलगतांलव ॥ धारासुरदैत्यानें ॥२१॥

देवसेनापरिवारित ॥ जेथेंहोतांशचिनाथ ॥ तेथेंजाऊनीत्वरित ॥ वचनबोलतइंद्रासी ॥२२॥

धारासुरम्हणेइंद्रासी ॥ तुंज्येष्ठम्हणुनाअम्हांसी ॥ राज्यविभागकांहींनदेसी ॥ नव्हेंम्हणसीपित्राजिंत ॥२३॥

स्वपराक्रमेंमिळाविलें ॥ ऐसेंबोलसीवचनाअगळें ॥तरीमीहीस्वतःपराक्रमबळें ॥ घेईनतुजलाजिंकोनी ॥२४॥

युद्धकरीजरीअसेलशक्ति ॥ नाहींतरीजारसातळाप्रती ॥ आह्मींस्वर्माचीसंपत्ती ॥ चिरकालभोंगुंसुखानें ॥२५॥

स्कंदम्हणेदानवेश्वर ॥ इंद्रासीबोलूनसत्वर ॥ इंद्रासवेंपरमघोर ॥ युद्धलागींप्रवर्तला ॥२६॥

इंद्रकोपीनियांथोर ॥ दैत्यासीमारिलेंदहाशर ॥ अश्वासीसारथ्यासीसत्वर ॥ नऊबाणानेंताडिलेंक ॥२७॥

बाणविरुद्धधारासुरें ॥ कोपेंइंद्रासीबाणसत्तरें ॥ ताडिलेंअश्वासीबाणसहस्त्रें ॥ सारतेहेविंधिलायेकबाणें ॥२८॥

दशबाणेंइंद्रपुत्रासी ॥ आठवाणेंगजेंद्रासी ॥ ताडिलेंधारासुरेंगेंसी ॥ विव्हळकेलेंसर्वही ॥२९॥

नानाविधशस्त्रेसोडोनी ॥ देवसेनाविकळकरोनी ॥ धरणीवरीतेचक्षणी ॥ पाडिताझालादेत्य तो ॥३०॥

सेनापतनपावलीपाहुनी ॥ इंद्राअश्चर्यकरीमनीं ॥ मगकोपोनीतेचक्षणींज ॥ अग्निअस्त्रसोडिलेंइंद्रानें ॥३१॥

अग्निप्रगटलादैत्यसेनेंत ॥ जाळुंलगलावाजरिथ ॥ दैत्येंवरुणास्त्रेत्वरित ॥ शमविलाअग्नितेधवां ॥३२॥

पर्जन्य अस्त्रसोंडलेंअदभुत ॥ देवसेनेवरवृष्टिअत्यंत ॥ होऊंलागलीसवेचीत्यांत ॥ विद्युल्लताचमकती ॥३३॥

जैसेंप्रळयकाळीनीर ॥ वृष्टिहोऊनचढेअपार ॥ तेव्हांत्र्यैलोक्यचराचर ॥ बुडोनजायज्यापरी ॥३४॥

इंद्रेवायव्यास्त्रसोडिलें ॥ मेघसर्वहीजिराले ॥ जळसर्वहीशोषिलें ॥ वायूनेंपीडिलेदैत्यासी ॥३५॥

वायुचक्रींगजभ्रमती ॥ रथउडोनियांजाती ॥ भयपीडितशुभ्रकांती ॥ झाल्यातेव्ह्यादैत्याच्या ॥३६॥

मगकोपोनियांधारासुर ॥ पर्वतास्रसोडीसत्वर ॥ वायुरोधुनीर्शालावृष्टिथोर ॥ देवसेनेवरीहोतीझाली ॥३७॥

गगनांतुशीलापतन ॥ तेणेंदेवसेनाहोतसैचुर्ण ॥ तेव्हांइंद्रवेज्रास्त्रसोडुन ॥ निवारनकेलेंपर्वताचें ॥३८॥

वज्रास्त्रेनाशदैत्यसेनेचा ॥ अतिशयेहोऊंलागलासाचा ॥ पुन्हांपर्वतनामकऋषीअस्त्राचा ॥ प्रयोगकेलादैत्यानें ॥३९॥

निवारणझालेंवज्रास्त्राचें ॥ जैसेंसुर्यादयींतमाचें ॥ बळखुंटलेंकुलेशाचें ॥ हेंपाहुनीइंद्रानें ॥४०॥

लोपामुद्राअस्त्रसोडुन ॥ कुंठितकेलेंमुनीअस्त्रजाण ॥ तेंपाहुनबलीनंदन ॥ कोपलादारुणतेवेळीं ॥४१॥

गदाघेऊनहातांत ॥ इंद्राच्यावक्षस्थळींमारित ॥ तेणेंइंद्राकिंचितधुर्णित ॥ कोपयुक्तबहुतझाला ॥४२॥

अमोघवज्रघेऊनहातांत ॥ दैत्यमस्तकींप्रहारकरीत ॥ परितोधारासुरकिंचित ॥ चलनपावलानसेची ॥४३॥

पर्वतासीजैसातृणप्रहार ॥ तैसामानिताझालासुर ॥ ब्रह्मादेवाचापूर्णवर ॥ विष्णुविणइतरमारुंनशके ॥४४॥

अमोघवज्रझालेंव्यर्थ ॥ पाहुनदेवभयग्रस्त ॥ रणसोडुनिपळालेत्वरित ॥ देक्गंधर्वविद्याधर ॥४५॥

महोरगसाध्यविश्वदेव ॥ दशदिशापळालेसर्व ॥ इंद्रसर्वदेवांचादेव ॥ भयपीडितबहुतझाला ॥४६॥

ज्यांवज्रेंवृत्रासुर ॥ आदिकरोनीदानवासुर ॥ वधिलेंतेंचेआजवज्र ॥ कैसेंनिष्फळझालेंहो ॥४७॥

इंद्रविचारकरोनीमनीं ॥ गेलारणभूमिटाकुनी ॥ आपुलालेअधिकारसोडोनी ॥ लोकपालगेलेदशदिशा ॥४८॥

राज्यभ्रष्टदेवसर्वही ॥ मनुष्यासारखोफिरतीमही ॥ धरासुरहोऊनीविजयी ॥ घेतलेंऐश्वर्यदेवाचें ॥४९॥

रत्‍नसमुच्चयसर्वहरून ॥ लोकपाळाचेंअधिकारसपुर्ण ॥ दानवांलागींदेऊन ॥ आज्ञांकितकरुनठेविलें ॥५०॥

सर्वांवरीस्वामित्वठेवुन ॥ स्वाधीनकेलेंत्रिभुवन ॥ शंकरवरिष्ठाकरीलकथन ॥ स्कंदसांगतऋषीसी ॥५१॥

म्हणेपांडुरंगजनार्दन ॥ देवाविष्णुसीजातीलशरण ॥ तोकथाभागसंपुर्ण ॥ उत्तराध्यायींगोडअसे ॥५२॥

इतिश्रीस्कंदपुराणे ॥ सह्याद्रीखंडेतुरजामहात्म्ये ॥ शंकरवरिष्ठसंवादे ॥ देवपराजयोनाप ॥ त्रिंशोध्यायः ॥३०॥

श्रीजगंदबार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel