हिंदू धर्मात अनेक देवी देवताची आराधना केली जाते.  त्यातील एक म्हणजे भगवान् श्री कृष्ण. अधर्म विरुद्ध धर्माचा विजय ही महाभारताची शिकवण आहे. महाभारतात कृष्णाचे पात्र खूपच महत्वपूर्ण होते कारण कृष्णानेअर्जुनाचा सारथी बनून त्याला मार्गदर्शन केले होते, शिवाय त्याला दहा अवताराचे दर्शन दिले होते. श्री कृष्णानी केलेल्या रासलीलाचा अभ्यास केला की आपल्याला समजते की प्रत्येक रासलीला हा जीवन जगण्याचाएक साधा सरळ मार्ग आहे..
 
भगवान श्रीकृष्ण हे रुक्मिणीचे पती असले तरी त्यांच्या नावापुढे राधाचे नाव लावले जाते- राधाकृष्ण! त्यांनी देवकीच्या पोटी जन्म घेतला म्हणुन देवकी नंदन आणी यशोदेनी त्यांचे पालन केले म्हणुन ते यशोदानंदन झाले.श्रीकृष्ण परमात्माची लीला अपरंपार आहे. आज अश्याच एका श्रीकृष्ण मंदिराला आपण भेट देणार आहोत.
 
बंगलोर मधील इस्कॉन मंदिर हे राधाकृष्ण मंदिर या नावाने सुद्धा ओळखले जाते.ओरीयोन मॉल पासून फक्त 1km अंतरावर असलेले हे इस्कॉन मंदिर. हरे कृष्णा हिल्स वर असलेल्या इस्कॉन मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठीबस, मेट्रो ट्रेन कीवा ओरीयोन मॉल पासून पायी प्रवास करू शकता.. जर मेट्रो ट्रेननी प्रवास करणार असाल तर संदल सोप फॅक्टरीपासून महालक्ष्मी एन्ट्रन्स पर्यंत चे तिकीट घ्यावे लागेल. जर दोन चाकी, चार चाकी वाहनअसेल पार्किंग लॉट उपलब्ध आहेत..
 
इस्कॉनचे पुर्ण नाव international society for krishna consciousness (आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ) आहे. भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात इस्कॉन मंदिर आहेत. न्यूयॉर्क मध्ये 1966 साली श्री स्वामीप्रभुपादजी यांनी इस्कॉन मंदिरची स्थापना केला. श्री स्वामी प्रभुपादजी यांनी वयाच्या 55 वर्षी सन्यास स्वीकारला आणि  हरे कृष्ण हरे राम असा प्रचार पूर्ण विश्वात केला.
 
आज पुर्ण जगात जवळ जवळ 400 इस्कॉन मंदिर आहेत. या इस्कॉनचे अनुयायी हिंदू धर्म आणि श्रीमद् भागवत गीता यांचा प्रचार पुर्ण जगभर करत आहेत. इस्कॉन चे अनुयायी हे दया, तपस्या, सत्य आणि मनाची शुद्धतायालाच आपला धर्म मानतात ..बंगलोरचे मंदिर जगातील सर्वात मोठे इस्कॉन मंदिर आहे…
 
मुख्य मंदिराला भेट देण्यासाठी आपल्याला दोन कमानींना पार करावे लागते. या मंदिराची स्थापना 1997 साली झाली आहे.. पाहिल्या प्रवेशद्वारातून मध्ये सुरक्षा रक्षक आहेत.. सिक्युरिटी चेकिंग झाली की चप्पल स्टँडजवळ चप्पल तिकीट घ्यावी लागते. काही पायऱ्या चढून गेल्यावर आपण दुसऱ्या दरवाज्याच्या जवळ जातो तेव्हा तिथे 17 मीटर ऊंची चा द्वाजस्तंभ दिसेल. हा द्वाजस्तंभ पूर्ण सोन्याचा मुलामा दिलेला आहे. या द्वाजस्तंभमुळे मंदिराची शोभा वाढते
 
त्याबरोबर येथे आपल्या कानावर महामंत्र ऐकायला येतो तो म्हणजे "हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम राम हरे हरे!  येथे मध्ये काळे गोरे, शिक्षित अशिक्षित,, असा भेदभाव केला जात नाही. यामंदिराचे बांधकाम हे आधुनिक व पारंपरिक पद्धतीने केले आहे….
 
मुख्य मंदिरात प्रवेश केल्यावर अलौकिक आनंद मिळतो. मनाला शांती व समाधान मिळते.. सकारात्मक उर्जेचे स्रोत असलेल्या मंदिराच्या आतील भाग हा सोन्याचा मुलामा दिलेला आहे, त्याबरोबरच काच  आणीलाकडापासून आतील भाग  बनवला आहे…. या मंदिरात राधाकृष्ण, बलराम कृष्ण व नरसिम्हा यांची नित्य आराधना केली जाते… या मूर्त्या इतक्या सुंदर पणे सजवलेल्या आहेत की जणु काही साक्षात श्री कृष्णा मंदिरातअवतरले आहेत असा भास होतो. मूर्तीच्या आसपासचे डेकोरेशन इतके सुंदर आहे जणु द्वारकेत बसुन द्वारकाधीश कृष्ण आपल्याला दर्शन देत आहेत असे वाटते. जवळच इस्कॉन चे संस्थापक श्री स्वामी प्रभुपादजी यांचीमूर्ती आहे.
 
जर मंदिरातून छताकडे पाहिलं की कृष्णच्या रासलीलाच्या पेंटिंग पाहायला मिळतात..श्रीकृष्णाच्या मूर्ती पुढे भाविकांना बसण्यासाठी एवढी मोठी जागा आहे की शेकडो भाविक बसुन भगवंताचे नामस्मरण करू शकतात."भक्तजन हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे" बरोबरच "गोविंद बोलो हरी गोपाल बोलो" असेही नामस्मरण करतात.
 
मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी या मंदिरात खुप गर्दी असते. येथे  4.15 AM ला मंगल आरती केली जाते. 4.45 AMला श्री तुलसी पुजा केली जाते.  AM ला श्रीनरसिंह आरती तर 5.10 AM ला श्री श्रीनिवासन गोविंदासुभप्रभात सेवा केली जाते. 5.20 AM ला जप मेडिटेशन केले जाते. 7.15 AM शृंगार दर्शन, आरती आणि गुरू पूजा केली जाते. 8.30 AM ला भगवत गीता वर प्रवचन होते तसेच नित्यनेमाने भजन कीर्तन होते. इस्कॉनटेम्पलची स्वत:ची एक गोशाला आहे, कारण हिंदू धर्मात गाय मातेसमान मानली जाते अणि बैल पिता समान. कारण गाय  दूध देते तर बैल शेतात राबतो व अन्न निर्माण करतो. या गायीच्या दुधाचा उपयोग अभिषेककरण्यासाठी तसेच नैवेद्यासाठी केला जातो.
 
भक्तांसाठी ईथे मल्टीप्लेक्स थेटरची सुविधा केली आहे. दर्शन झाल्यावर पायर्या उतरून खाली गेलो की शॉपिंग करण्यासाठी दुकाने दिसतील या दुकानात धार्मिक पुस्तके, धार्मिक वस्तू पाहायला मिळतात. ही धार्मिकपुस्तके जसे श्री कृष्ण जीवन चरित्र, महाभारत, भागवत गीता ही पुस्तके एकच नव्हे तर खूप भाषेत उपलब्ध आहे जसे कन्नड, मराठी, गुजराती, बंगाली, तमिल, तेलुगु. तेथून आपण exit झालो कि प्रसाद दिला जातो. दुपारीभक्तांच्या अन्नदानाची सुविधा उपलब्ध आहे .. जवळच असलेल्या तलावाजवळ बसून प्रसाद खाण्यात आनंद येतो…
 
या मंदिरात अनेक सण साजरे केले जातात. पण कृष्ण जन्माष्टमी आणी श्री राम नवमी  मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. कर्नाटक, भारत नव्हे तर परदेशातूनही लोक दर्शनासाठी येतात. अशा या निसर्ग सान्निध्यातअसणार्या मंदिराचे दर्शन घ्यायला येताय ना?

- लेखिका: अक्षता दिवटे, बंगलोर
इमेल: adivate484@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel