साहित्य:
रेड चिली सॉस, विनेगर, डार्क सोया सॉस, दोन मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर, दोन मोठे चमचे मैदा, बारीक किसलेली एक वाटी पत्ताकोबी, बारीक चिरलेली एक वाटी कांद्याची पात, बारीक चिरलेले गाजर एक वाटी, मीठ चवीनुसार, लसूण, आले हिरवी मिरची पेस्ट

कृती:
प्रथम बारीक चिरलेले सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे. त्यात मैदा आणि कॉर्नफ्लॉवर चांगले मिक्स करून घ्या.

आवश्यकतेनुसार त्यात थोडे पाणी घालून त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या.  गोळे तेलात डिप फ्राय करुन घ्या.

आता एका पॅनमध्ये थोडे तेल घेऊन त्यात बारीक चिरलेला लसूण, आले, हिरवी मिरची, कांद्याची पात टाकून परतवून घ्या. मग त्यात चार पाच थेंब विनेगर, एक चमचा सोया सॉस, एक चमचा रेड चिली सॉस टाका.

थोडे पाणी टाकून उकळी येऊ द्या. आता याच्यात आपण केलेले छोटे छोटे गोळे सोडा.

उकळी आल्यावर गॅस बंद करा. बाउल मध्ये टाकून सर्व करा

लेखिका: मंजुषा सोनार
ईमेल: sonar.manjusha@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel