("फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी" या लेखमालिकेत लेखक वैद्यक आणि औषधनिर्माण क्षेत्रांतील घडामोडीबद्दल माहितीपर लेख लिहितात)
फॅमिली फिजिशियन किंवा फॅमिली डॉक्टर ही संकल्पना सर्वांनाच परिचित आहे पण फॅमिली फार्मसिस्ट ही संकल्पना तुम्ही पहिल्यांदाच ऐकली असेल. 'औषधवितरण आणि त्यासंबंधित वैद्यकीय सेवा पुरवणे' हे फार्मसिस्ट चे काम आहे. याच्या एक पाऊल पुढे जाऊन फार्मसिस्ट त्याची ओळख 'फॅमिली फार्मसिस्ट' अशी बनवू शकतो. याचा फायदा रुग्ण आणि फार्मसिस्ट दोघांना ही होतो.
मुख्यत्वे याचा फायदा रुग्णांना होतो. त्यांना उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा मिळते. रुग्ण एकाच फार्मसिस्ट कडून सेवा घेत असल्याने रुग्णाची वैद्यकीय नोंद (Patient Medical Record PMR) हे फार्मसिस्ट कडे असते. त्यामुळे औषध वितरण करताना कोणतीही चूक होण्याची शक्यता तसेच औषध त्रुटी व औषधांचे हानिकारक परिणाम अशा गोष्टी होण्याच्या शक्यता टाळल्या जातात. याशिवाय आपत्कालीन स्थितीत तुम्हाला सहजतेने औषधे उपलब्ध होऊ शकतात.
रुग्ण इतिहासाची नोंद असल्यामुळे वैद्यकीय तपासणी व उपचारादरम्यान योग्य सल्ला व मार्गदर्शन हे केवळ तुमच्या फॅमिली फार्मसिस्ट कडून मिळू शकतो. तुमच्या दैनंदिन आरोग्यसंदर्भात योग्य मार्गदर्शन हे तुम्ही फॅमिली फार्मसिस्ट कडून घेऊ शकता.
तुमच्या आरोग्यसंदर्भात सर्व प्रकारच्या शंका, प्रश्न याबाबत तुम्ही फॅमिली फार्मसिस्टशी मनमोकळ्यापणाने बोलू शकता. औषधयोजनेशिवाय घेता येणारी औषधे (ओ.टी.सी ड्रग्ज) खरेदी करताना योग्य सल्ला व औषधाची निवड करताना तुमचा फॅमिली फार्मसिस्ट चांगल्या प्रकारे मार्गदर्शन व सेवा पुरवू शकतो. औषध योजनेबाबत सर्व सुविधा या योग्य रीतीने मिळू शकतात.
बाहेरच्या देशांमध्ये फार्मसिस्ट हा वैद्यकीय सेवेतील एक मुख्य घटक आहे. मात्र दुर्दैवाने भारतात 'फॅमिली फार्मसिस्ट' ही संकल्पना तितकीशी परिचित नाही. शिवाय व्यवसायात्मक त्रुटींमुळे वैद्यकीय सेवा देण्यात फार्मसिस्टदेखील कुठेतरी कमी पडत आहेत. परंतु आता हळूहळू भारतात देखील फार्मसिस्टची भूमिका व्यापक होत आहे. यासाठी सर्व फार्मसिस्टनी योग्य प्रकारे वैद्यकीय सेवा पुरवणं व डॉक्टर व रुग्ण यांनीही सहकार्य करणं गरजेचं आहे.
WE ARE PHARMACIST. ALWAYS READY FOR YOUR HEALTH. BETTER DRUGS FOR BETTER WORLD!
लेखक: आशिष अरुण कर्ले.
मोबाईल: 9765262926
ईमेल: ashishkarle101@gmail.com
(गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैरणे, नवी मुंबई)