स्त्रीमध्ये जेव्हा मासिक पाळी येणे पूर्णपणे बंद होते. त्या अवस्थेला 'रजोनिवृती' म्हणतात. रजोनिवृती ही एक प्रत्येक स्त्रीमध्ये ठराविक काळानंतर साधारणपणे ४० ते ५५ वयादरम्यान येणारी एक सामान्य अवस्था आहे. या अवस्थेमध्ये स्त्रीच्या प्रजनन अवयवामध्ये क्षीणता येण्यास सुरूवात होते. शरीरात हार्मोनल परिवर्तन होते व त्यामूळे मासिक स्राव पूर्णपणे बंद होण्यास सुरूवात होते.  रजोनिवृती चाळिशीनंतर प्रामुख्याने आलेली आढळते. रजोनिवृती काळाचे सरासरी  वय हे ४७ वर्ष इतके आहे. जर वयाच्या ४०शी पूर्वीच आल्यास त्या विकृतीस 'अकाली रजोनिवृती ' (precocious Menopause) असे म्हणतात. वयाच्या ५५ व्या वर्षानंतर जर रजोनिवृती झाल्यास त्या विकृतीस 'विलंबित रजोनिवृती'- (Delayed Menopause)असे म्हणतात.

लक्षणेः शारिरीक,मानसिक व भावनिक स्तरावर रजोनिवृतीत खालील लक्षणे उत्पन्न होतात.
•    शारिरीक थकवा जाणवणे.
•    अंगदुखी, डोके दुखणे, कंबर व सांध्याच्या ठिकाणी वेदना होणे.
•    चिडचिड होणे.
•    अनुत्साह आळस येणे.
•    त्वचा कोरडी होणे.
•    हाडे ठिसूळ होणे.
•    छातीत धडधडणे.
•    झोप न लागणे.
•    भूक मंदावणे.

कोणती काळजी घ्यावी ?  
•    रजोनिवृतीमध्ये आहाराकडे विशेष लक्ष देणे.
•    या अवस्थेत हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण वाढते. त्यामूळे आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थाचा समावेश  करावा.
•    सकाळ- संध्याकाळ फिरावयास जावे.
•    मानसिक ताण, तणावापासून दूर रहावे. यासाठी प्राणायाम, ध्यानधारणा करावी.
•    आपल्या आवडीचा छंद जोपासावा.
•    विविध पुस्तके,कादंबऱ्या वाचाव्यात.
•    अध्यात्माची ओढ लावून घ्यावी.
•    सर्वात महत्त्वाचे रजोनिवृतीची भिती मनातून काढून टाकावी.

लेखिका: अभिलाषा देशपांडे , डोंबिवली, मुंबई
मोबाईल:  7045948961                                                                                 
ईमेल: abhilashardeshpande@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel