(हा लेख ज्योतिषशास्त्राशी संबंधित आहे)
शनि हा सूर्यमालेतील सहावा ग्रह आहे. शनीच्या भोवती कडे आहे. शनीचा व्यास 120500 किमी आहे. अडीच वर्षांमध्ये शनी एक रास पुढे सरकतो. शनीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास साधारण 29 वर्षे लागतात.
शनीदेवांच्या डोक्यावर सुवर्ण मुकुट, गळ्यात माळा शरीरावर निळ्या रंगाचे वस्त्र असते. शनीच्या हातात धनुष्यबाण आणि त्रिशूल असते. शनीच्या फेऱ्यात शंकराला बैल बनवून जंगलातून फिरायला लागले होते. रावणाला पण मृत्यूच्या फेऱ्यातून जावे लागले.
शनिदेवाचे वडील सूर्य आहेत. कुंडलीतील शनीचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. अंकशास्त्र नुसार शनि 8 अंकाचा कारक आहे. शनि मकर व कुंभ राशीचा अधिपती आहे. शनीचा शरीरातील हाडांवर अंमल आहे. ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोनातून पाहिल्यास शनि आयुष्याचा कारक आहे. शनीचा मूळ पिंड दुःख आणि नैराश्यवादी आहे. शनी हा मृत्यूचा कारक आहे. शनीचा अंमल शरीरातील हाडांवर असतो.
कंपवात, दीर्घ मुदतीचे आजार, संधिवात, खोकला, अर्धांगवायु, मुकेपणा, व्यंग वगैरे दृष्टीने शनीचा अभ्यास कुंडली साठी करता येतो. शनी हा व्यवसाय आणि उद्योग यांचा कारक आहे. ज्योतिषांनी शनीचा संबंध आयुष्य मरण भय लोखंड शिसे वृद्धावस्था दारिद्र्य चोरी आळस व्यंग मोह नाश निष्ठुरता दुर्बुद्धी आपत्ती दैन्य कष्ट या गोष्टींशी लावला आहे. या सर्व गोष्टींचा कारक ग्रह म्हणजे शनी. शनि हा शांत मंद विचारी गंभीर आहे, शनी काटकसरी आहे. शनी आतल्या गाठीचा आहे. दीर्घ विचार, हळूहळू घेतले जाणारे निर्णय, सतत टोचणी, काळजी, हळूहळू ग्रासणारे नैराश्य, पीछेहाट होणे, उतरती कळा हे सगळे शनीच्या कारकत्व खाली येते.
शनि ची सकारात्मक बाजू म्हणजे तो कुंडलीतील चांगल्या स्थितीत आणि अनुकूल असेल तर चिकाटी, दीर्घोद्योगी पणा, उत्तम नियोजन, सूत्रबद्धता, सुसंगतता, कार्य-कारण परिणाम वगैरे सर्व देतो. त्यासोबत तो काटकसर, शांतपणा, व्यवहारीपणा हे सगळे देतो.
शनी हा पूर्वजन्मी केलेल्या कर्माप्रमाणे फळ देणार असतो. म्हणून हा ज्योतिष शास्त्र मधील सगळ्यात महत्त्वाचा ग्रह ठरतो. हे फळ साडेसाती तसेच शनीच्या महादशेत मिळते. साडेसाती साडे सात वर्षांची तसेच शनीची महादशा 18 वर्षांची असते.
शनिच्या साडेसाती आणि त्याच्या महादशेत आणि अंतर्दशेत तो कुंडलीमध्ये ऍक्टिव्ह होतो. शनि प्रत्येकालाच वाईट फळ देतो असे नाही. कुंडलीतील द्वितीय स्थान तसेच इतर ग्रहांशी असणारे संबंध त्यावरून हा निर्णय घेता येतो.
लेखिका: मंजुषा सोनार, पुणे (ज्योतिष प्राज्ञ)
मोबाईल: 9767676972
ईमेल: sonar.manjusha@gmail.com
(लेखिका अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यासक असून त्या ज्योतिष विषयातील पदवीधारक तसेच अंकशास्त्र प्रवीण आहेत)