suvrnasonawane777@gmail.com
7744880087
ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर असं वाटत की निष्काम कर्मयोगाच्या मऱ्यादा आहेत ज्ञानाला मऱ्यादा नाही. पण पुर्ण ज्ञानाला भक्तीची जोड दिल्या खेरीज ज्ञानाला आनंदात्मक असं स्वरूप येत नाही. आजवर आपण ज्या संत महात्माच्या हातून जे सुंदर लिखाण झाले आहे त्या ग्रंथांचे आपण वाचन करतो त्यांची पुजा करतो.
संत महात्म्याना देव स्वरूप प्राप्त झाले ते त्यांनी केलेल्या भक्तीमुळेच. भक्ती शीवाय ज्ञानाची पुर्ण धारणा होत नाही. ज्ञानाची धारणा झाल्याशिवाय स्वतःचा पूर्ण परिचय मिळू शकत नाही आणि परमेश्वराची खरी ओळख मिळत नाही. परमेश्वराची खरी ओळख मिळाल्या शिवाय त्याची भेट घडू शकत नाही. परमेश्वर एकच आहे, तो सर्व आत्म्याचा एक पिता महादेव ज्याचे मुळ स्वरूप ज्योती रुप आहे. म्हणूनच आपण महादेवाची पुजा ज्योर्तीलिंग स्वरूपात करतो ज्याला स्वतःचा देह नाही आपले मुळ स्वरूप सुद्धा ज्योती स्वरुप आहे. आपण सर्व आत्मा आहोत शरीर नाही हे शरीर कर्म करण्यासाठी मिळालेले साधन आहे. आत्मा शरीराद्वारे कार्य करत असतो. कर्मबंधन संपले की आत्मा एक शरीर सोडून दुसरे धारण करतो शरीर विनाशी आहे आत्मा अविनाशी आहे. म्हणूनच आपण जन्मजन्मांतरापासून ज्योर्तिलिंग स्वंरुपातील महादेवाची पुजा करतो. मुर्ती स्वरुपातील शंकराची नाही. कुठल्याही मंदीरात शंकराची मूर्तीपूजन होत नाही. महादेव आणि शंकर हे वेगवेगळे आहेत शंकराला देह आहे महादेवाला नाही शंकर सुद्धा ध्यान मग्न अवस्थेत महादेवाचेच ध्यान करतो तिन्ही देवाची निर्मिती महादेवानेच केलेली आहे आपण नेहमी ॐनमःशिवाय म्हणतो ॐशंकराय नमः म्हणत नाही. कारण आपण व्दापारयुगा पासुन जन्मोजन्मी महादेवाची म्हणजेच शिव परमात्मा ची पुजा करीत आलो आहे म्हणूनच भारतात सर्वात जास्त महादेवाची पौराणिक मंदिरे आढळतात.
ब्रम्हा निर्माण करता सृष्टीचा विष्णू पालनकर्ता शंकर विनाशकारी जेव्हा जेव्हा नवसृष्टीची निर्मिती होते तेव्हा तेव्हा जुनी सृष्टीचा विनाश शंकराव्दारे केला जातो. ॐ शांती