कुठल्याही चहासोबत मला बिस्किट्स हवीच,  पण जेव्हा वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत मैद्याची बिस्किटे बाधा बनत होती.  तेव्हा मी गव्हाच्या पिठाची बिस्किट्स घरीच बनवायला लागले.  आणि आता त्यात मी प्राविण्य मिळवलं आहे कारण माझ्या मुलींना तेच बिस्किट्स/ कुकीज हव्या असतात.

आता मुलांना सुट्टी म्हटलं की मुलं सारखी नवनवीन खाण्याची पदार्थ मागतात.  मुलाच्या हेल्थ आणि आपली चहाची सोय म्हणूंन आजची रेसेपी.  पौष्टिक अश्या गव्हाच्या पिठाची बिस्कीट.  कुकीज म्हणू शकतो.  बिस्किट्स/कुकीज  हा प्रकार जेव्हाही विचारत येतो मैदा लक्षात येतो,  आणि मैदयाची बिस्किट्स हे हेल्दी नसतातच.  बाजारात मिळणारे सर्वच बिस्कीट मैद्याची असतात शिवाय डालडा वापरून केलेलेही असतील.   गव्हाचं पीठ घरी असतंच आणि पोष्टीकही आहे.  आणि साजूक तुपातली हि पौष्टिक बिस्किट्स सर्वच वयातल्या लोकांसाठी उत्तम टी टाइम रेसेपी आहे.  वजन कमी करण्याच्या प्रक्रियेतहि  तुम्ही हे बिस्कीट ग्रीन टी सोबत खाऊ शकता.  मी इथे अगदीच दोन्ही पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे.  ओव्हनचा वापर करून आणि गॅसवर तवा ठेवून.  तुम्हला जी पद्धत सोयीची वाटते ती निवळा.  आणि बनवा खुसखुशीत बिस्किट्स/ कुकीज घरच्या घरी.

साहित्यः

२ कप गव्हाचे पीठ,

१ टीस्पून राव.

१/२ कप तूप,  किंवा अनसॉल्टेड बटर,

१/२ कप पिठीसाखर,

१ चिमूटभर मीठ,

१/४ बेकिंग पावडर.

१/२ टीस्पून विलायची पूड,

१/४ टीस्पून जायफळ पूड

१/२ कप दूध

१/२ कप आवडीनुसार ड्राय फ्रुट

नोट- गव्हाच्या पीठ आणि साजूक तुपाचे प्रमाण योग्य असावेत,  मी कपाच प्रमाण घेतलं आहे तुम्ही,  वाटी,  स्पून असं काहीही घेवू शकता.  पण प्रमाण मात्र ४-१ असेच हवेत.  उदाहरणार्थ,  चार स्पून गव्हाचं पीठ तर एक स्पून साजूक तूप.

कृती-

१.  तूप किंवा बटर ला फेटून घ्या,  फेटण्याच्या प्रक्रियेमुळे बेकिंग पॉवडरची गरज पडत नाही.  पण वाटलंच तर १/४ टीस्पून बेकिंग पावडर वापरू शकता.  तूप संपूर्ण फेसाळ झालं की त्यांत साखर टाका आणि परत फेटा,  सर्वात महत्वाची स्टेप आहे हि.  बिस्किटाचा खुशखुषितपणा ह्या तूप फेटण्याच्या पद्धतीवर अवलंबून असतो.  साधारण १० मिनटे.  जास्तही देवू शकता.  स्टेप १ चा फोटो रेफर करा.  जेंव्हा हे मिश्रण आईस्क्रीम सारखं दिसायला सुरुवात होईल तेंव्हा ते तयार आहे पीठ मिसळायला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel