पूनम कुलकर्णी,  औसा (लातूर)
poonamkulkarni789@gmail.com  
9834179075


" रुचिता ए अग थांब, किती वेळ झालं आवाज देतेय" , साक्षीने आपली जिवलग मैत्रीण रुचिताला आवाज दिला. रुचिता थबकली अन साक्षीला पाहताच मान खाली घातली अन थोड्याच वेळात घळाघळा अश्रू गळायला लागले. " साक्षी, सगळं संपलं गं" रुचिताने टाहो फोडला. " अग झालं तरी काय, बस बघू इथे, आणि काय ग काय अवतार करून  घेतलाय स्वतःचा. झालय काय?" , साक्षीने चिंताग्रस्त होऊन प्रश्न विचारला.

रुचिताने डोळे पुसले आणि मग एक एक पान वाचायला सुरुवात झाली. साक्षी आणि रुचिता जिवलग मैत्रिणी, एकाच कॉलेज मध्ये दोघींची शिक्षण झाली. रुचिता घमेंडी होती. रूपाचा गर्व दुसरं काय. कॉलेज झाल्यास दोघीही मुंबई ला आल्या. मुंबापुरी, स्वप्नाची महानगरी.  साक्षीने जवळच असलेल्या एका प्रायवेट कंपनी मध्ये जॉब करायला सुरुवात केली. रुचिताला ही लाईफ पटणारी नव्हती. तिने मॉडेलिंगला ऍडमिशन घेतलं. दोघींचं routine चालू होतं सुरळीत.
       
रुचिताला लवकरात लवकर फॅशन जगात जम बसवायचा होता. त्यातच तिची ओळख एका गाजलेल्या मॉडेलशी झाली. तिला स्वप्न पूर्ण करायचं होतं. त्याला ती हवी होती. दोघांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय त्यांनी घेतला
             
अमेय कामाच्या बाबतीत अतिशय शिस्तप्रिय होता. त्याच्या सहकाऱ्याकडून झालेली एक चूकही त्याला सहन होत नसायची.  रुचिताला त्यांने सार शिकवलं. दोघांनी लग्नही केलं.
             
इकडे साक्षीनेही लग्न केलं आणि banglore ला शिफ्ट झाली. रुचिताशी संपर्क तुटला. इकडे रुचिता आणि अमेय दोघांचा सुखाचा संसार चालू होता. अमेयला एका रात्री कॉल आला. रात्रीचे एक वाजलेले. " कोण आहे, अमेय", रुचिताने प्रश्न विचारला. तसा अमेय गडबडला" कुणी नाही, झोप तू मीटिंग आहे, मी जरा जाऊन येतो. " अमेय निघून गेला.  काय असेल या विचारांनी रुचिता रात्रभर झोपू शकली नाही.
              
तीन दिवस होऊन गेले तरी अमेयचा पत्ता नव्हता. मोबाईल फोन switch ऑफ होता. तेवढ्यात बातमी आली की प्रसिद्ध मॉडेल अमेय यांचा अपघातात मृत्यू. रुचिता भोवळ येऊन पडली. रुचिताच्या आई वडिलांना बातमी कळाली. दोघेही लेकीकडे आले. सोबत  अजून एक बातमी होती की अमेय ची सेक्रेटरी कुमुदही सोबत होती. दोघे लोणावळ्याला रिसोर्ट ला जात असताना त्यांचा अपघात झाला होता.
              
रुचिता या धक्क्यातून सावरत होती. तोच तिची भेट आज साक्षीशी झाली. एवढं सगळं रामायण सांगितल्यास साक्षीच्याही डोळ्यांत पाणी आलं. आपल्या मैत्रिणीची झालेली ही अवस्था तिलाही धक्का देणारी. ती काही दिवसात परत banglore ला जाणार होती. पण तिचा पाय निघेल तेव्हा न.
               
साक्षीला एक मार्ग सुचला आणि तिने तातडीने रुचिताला बोलावून घेतल आणि तिला सांगितलं.  
                 
" नाही नाही, हे शक्य नाही मी दुसऱ्या कुणासोबत लग्नाचा विचारही करू शकत नाही, साक्षी अग तू माझी जिवलग न मग परत मला आगीतून फुफाट्यात का ढकलते. मला हे मान्य नाही आणि सुधीरला काय वाटेल छे छे" साक्षीने स्पष्ट शब्दात नकार कळवला.
                    
" मला सगळ मान्य आहे" , सुधीरने दरवाज्यातून होकार कळवला.
                     
सुधीर, साक्षीचा मावस भाऊ. त्याला रुचिता पहिल्यापासून आवडायची. पण रुचिता ने त्याच्यात कधी interest नाही घेतला. सुधीरही हळूहळू त्याच्या life मध्ये व्यस्त झाला
                     
साक्षीने झाली परिस्तिथी सुधीरला आधीच सांगितली होती सुधीर लग्नाला तयारही झाला. त्याने तातडीने ट्रेन पकडली. साक्षीने सुधीर आणि रुचिता दोघांच्याही आई बाबाना बोलावलं होतं. ते सगळे एकत्रच बाहेर येऊन बोलले, "आम्हालाही मान्य आहे" .
                  
" साक्षी तू माझ्यासाठी एवढं केलं", अस म्हणत रुचिताने साक्षीला मिठी मारली आणि हुमसून रडू लागली. " छे ग माझ्या माझा स्वार्थ आहे यात माझ्या भावाला मुलगीच नव्हती मिळत. तशा आल्या बऱ्याच पण त्याला रुचिताच् हवी होती" , साक्षीच्या या बोलण्यावर एकच हशा पिकला. अशा कित्येक रुचिता आहेत. त्या सगळ्याना गरज आहे एका साक्षी ची.

(ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel