udayjadiye2006@rediffmail.com
9552626496


मला गवसलं आहे,  माझ हरवलेलं बालपण
माझ्या मुलीच्या अस्तित्वात,  तिच्या छोट्याशा भावविश्वात
तिची चिमुकली मुठ उघडताच,  मला गवसले क्षणात सोनेरी क्षण
तिचे कोवळे हास्य खुलताच,  मी साठवले मनात चंदेरी क्षण
तिच्या गोड गोजीऱ्या बालपणाला,  एक नवा आकार देऊ
आपले निसटलेले क्षण आणुन,  तिचं नवं स्वप्न साकार करू
तिच्यासाठी सोसलं आहे,  तू बरचं काही
ती सध्या सांगते,  बोबडया भाषेत काही
कोवळा अंकुर वाढवलास,  तू कणाकणानं
इवलासा जीव जपलास,  तू तनामनानं
मी - तू - स्वप्न – भविष्य,  या चौकटीतील प्रेमपुष्पात
रंग भरुन अथक प्रयत्नांचे,  वात्सल्याचे,  आणि माझ्या हरवलेल्या बालपणाचे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel