तलावाच्या काठावरती पाखरांचा थवा जमला
नव्या जुन्या गोष्टी, आठवांचा उजाळा झाला
मित्र, मैत्रिणी, सखे, सोबती, दोस्त, सवंगडी
कोण नावे द्यावी तरी या नात्याची एकच गोडी
उरले सुरले, काही स्मरले काही विसरले
भेटीच्या आशेवरती एक साल अधिक सरले
आज तो क्षण आला, मन भारावून जो गेला
तुम्हा भेटीच्या सुखावल्या मनी कितीक कळा
चार घटिका सुखवणार्या, त्या कधी न होय अंत
भाव निराळे भवनांतुनी दाटुन येई कंठ
पुन्हा एकदा पांगा-पांग ही कुणा न समजायाची
पुन्हा भेटीची मनी कामना, असे अपर्यायाची
चुक-भुल द्यावी घ्यावी......
पुन्हा भेटू.......
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.