abhilashardeshpande@gmail.com  
7045948961

१ )     येता शिशीर हा धावून
होते सा-याचीच तारांबळ
फुलतो तो बहरून पळस
पण झाली जागोजागी पानगळ    

२)    आला शिशीराचा वारा
पानगळ सुरू  झाली
गेला कचरा वा-याने
नवी पालवी फुटली

३)      येता शिशीर दारी
पाने टाकती कात
गुलमोहर पिवळा भारी
फुलून सजतो त्यात    

४)       नव देण्याच्या
निसर्गाचा अलंकार
वठलेल्या मनाला
नव तिचा शृंगार
५)        पालन निसर्गाचे
नवीन फुटे पालवी
गळती तृप्ततेने
चक्र कौतूके चालवी    

६)       चक्र निसर्गाचे पानगळ
गळतील पाने पिकली
त्या पानावरही  प्रेम करावे
हिरवी असताना दिली सावली

७)         शिशीराच्या पानगळीशी
नाळ जोडलेली
पालवी फुटता
स्पंदने  दाटलेली    

८)         आला शिशीर ऋतू
पानगळ झाली
नवी पालवी येणार
पानफुले येती तरू

९)      कुडीतून प्राण जाता
उरतो हा देह नश्वर
जरी पानगळीत पाने झडती
वृक्षाला येतो पून्हा बहर    

१०)    पानगळ हवीच हो
जुने जीर्ण लया जाते
घ्यावया त्यांची ती जागा
नवीन काही  उद्या  येते

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel