(अर्थात प्रशंसेचा प्रयत्न)

        नुकत्याच एका मैत्रीणीच्या आजारी सासूला भेटून आले. दोघींचीही तक्रार एकच..." एव्हढ केल मी हिच पण दोन शब्दांच कौतुक नाही. " वास्तविक त्या मैत्रीणीने सासूच्या भरवशावर उत्तम नोकरी करत आपली मुले वाढवली... सासूला देखिल ठावूक आहेच की आपल्या लेकी जेव्हढ्या मायेन करत नाहीत सून करते... अगदी प्रेमानं ... ...

गरज आहे ते आवर्जून बोलून दाखवायची.

           नेहमी एक गोष्ट तीव्रतेने जाणवते की आपण स्त्रिया सर्वाधिक कद्रू कश्यात असतो तर प्रशंसेत..

कोणत्याही वयाच्या , कितीही शिकलेल्या ,नोकरी करणाऱ्या , व्यावसायिक वा गृहिणी असो.... 

दुसऱ्या स्त्रीची तारीफ चटकन मनापासून करताच येत नाही.अत्यंत कोत्या मनानें, क्षुद्र मनोभूमिकेने आपण सतत एकमेकींना स्पर्धक समजत राहतो... जणू तिची रेषा मोठी झाली की माझी लहान होणार आहे. हे वाढता वाढता एव्हढे वाढते की आपल्याला काही सुंदर आगळे दिसणेच बंद होते. 

           छान तयार होऊन भिशी ला स्वागत करणाऱ्या मैत्रीणी कडच्या फर्निचरची धूळ आपल्याला दिसते तर घर लक्ख आवरणाऱ्या सखीचा गबाळा अवतार आपल्या डोळ्यात सलतो. डाएट जिम वगैरे करून स्वतःला जपणाऱ्या मैत्रीणीला आपण नटवी म्हणतो तर सकाळ पासून रात्रीपर्यंत घरासाठी राबणाऱ्या गृहस्वामिनीला आपण काकूबाई म्हणतो. खरतर समस्या बरेचदा हीच असते की आपण काही म्हणतच नाही.

   एकीच्या मुलाला दहावीला 93% मिळाले... इतरांची प्रतिक्रिया " मिळणार नाही तर काय? हीने दुसर केलच काय वर्षभर ... मुलाची दहावी म्ह्णून भिशी सुध्दा बंद केलीनं ."

दुसरीच्या मुलीला 65% मिळाले प्रतिक्रिया " जरा लक्ष नाही दिल हिने सदा घराबाहेर.."

गम्मत आहे ना अहो सोप आहे दोघिन कडेही जा मनापासून अभिनंदन करा ... आईचे कौतुक करा काय लागत हो यालां ... ह्म्म मन मात्र जरास मोठ लागत. 

.. माझ्या या मतावर तडकून एक जेष्ठ मैत्रीण म्हणाली.. " मला नाही बाई येत अस लगेच चांगल म्हणता... जेव्हा फारच उत्तम performance असेल तेव्हाच मी छान म्हणते." 

का ग तू ऑस्करची ज्युरी आहेस ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel