प्रत्येकीच्या नशिबात,
एक असावा नवरोबा
आपल्याला कळत नसतं
तो एवढा वेंधळा कां असावा॥१॥
बायकांशी बोलतांना तो इतका,
गोड,मधुर कां असावा,
अजून शोध लागला नाही,
बायकोने,काय एवढ पाप केलं असाव॥२॥
शेजारणीने केलेल्या बेचव,
आमटीचं त्याने तोंड भरून,
कौतुक करावं आणि,
बायकोचं मिठ,त्यास अळणी लागावं॥३॥
इकडच्या वस्तु तिकडे ठेवून,
बायकोला सतत सतवावं
आरडा-ओरडा करून,
आपलेच वर्चस्व ठेवावं ॥४॥
लग्नांत दिलेला सूट,
होत होता,तेव्हां ढगळा
आता नाही लागत कोटाची बटणं,
अन् मावत नाही,त्यात पोटोबा॥५॥
नवऱ्याच्या प्रेमाची,
तऱ्हाच असते न्यारी,
काळजी पोटी चिडचिड
अन् प्रेमा पोटी ओरडा असतो,सुरूंच॥६॥
आयुष्याच्या उतरंडीवर
एक मात्र असतं,
नवरा किती बडबडला तरी,
दुर्लक्ष करण जमतं ॥७॥
संसारात काबाडकष्ट करून,
संसाराचा गाडा ओढायला,
नवऱ्याची साथ मात्र लागतेच,
थकल्या नवऱ्याचा,हात असतो आधाराचा॥८॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.