नवऱ्याच्या आस्तित्वाची इतकी,
सवय लागलेली असते.
तो नसण्याची कल्पनाच,
सहन होत नसते.  ॥९॥

नवरा-बायकोच पवित्र-बंधन,
जगावेगळच असतं,
एकाने सोडलं तर,
दुसऱ्याने सावरायचं असतं ॥१०॥

रूसवे-फुगवे झाले,
तरी एकावाचून,
दुसऱ्याचे अडतं,
हेच तर,संसाराचं खरं ब्रीद असतं ॥११॥

संसाराला व्यवस्थित,
वळण लागायला,
मधून,मधून हो मधे हो,
मिळवावा लागतो ॥१२॥

सूना,नातवंडांनी,
घर छान भरलेलं असतं,
बायको सोबतं रमायला,
वेळ मात्र,मिळतं नसतो ॥१३॥

नवऱ्याशी वाद घालतांना
तोल सांभाळावा लागतो.
लुटुपुटुचा वाद तो,
लटकाच असावा लागतो. ॥१४॥

सगे असतात बकळ,
पण नवरोबांची गंमत,
हेच,खरं असतं नात संगतं.
कानाडोळा करून,जमतं नसतं॥१५॥

आंबट-गोड,तुरट-कडू,
याचं मिश्रण,असावं लागतं,
तरच संसाराचा रथ,
ढकलतं,पुढे सरकतं असतो॥१६॥

दि.१६ सप्टेंबर.२०१९             
© नीला पाटणकर

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel