असूनही तू ममतेचा सागर,
तुझ्याच नयनी का ग आसवांचा पूर.
असूनी कहाणी तुझी जगी थोर,
तुझ्याच जीवाला ग किती घोर.
सांगती सारेच इथे,
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिखारी.
एेकूनी हे बोल जनांचे,
किती वेदना दाटती तुझ्या अंतरी.
आई तुझ्या प्रेमाची,
गोष्टच ग किती न्यारी.
उतारवय येता तुझे,
पोटची लेकरेच दावती तुला आश्रमाची वारी.
आजच्या युगात या ग,
हवीस तू फक्त पंखात बळ येईपर्यंत.
मग येईल कोण परतूनी तुला पाहण्यास,
असशील तेंव्हा तू एकटीच त्या घरट्यात.
अन् अश्रू भरल्या नयनांनी,
पाहत राहशील तू चोहि दिशांत.
आई,आता राहिली नाही ग,
किंमत तुझ्या अनमोल आसवांची या कलयुगात .... या कलयुगात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.