जगातील सहा न उलगडलेले रहस्य . 1) वॉयनिच मैन्युस्क्रिप्ट (Voynich Manuscript) पॉलिश मूळ चे अमेरिकी पुरतात्विक पुस्तक विक्रेता, विल्फ्रिड एम वोयचीन द्वारे 1912 मध्ये ह्याच अधिग्रहण केल गेलं. वॉयनिच मैन्युस्क्रिप्ट (Voynich Manuscript) पूर्ण 240 पानाचे एक पुस्तक आहे ,जिच्यात अशी भाषा आणि चित्रांचा समावेश आहे की ज्याला कोणीच वाचू आणि समजू शकत नाही.पुस्तकातील चित्रा आणि भाषा जगात कुठेच अस्तीत्वात नाही .आता पर्यन्त हे स्पष्ट होऊ एसएचकेला नाही की हे पुस्तक कुणी आणि कुठे लिहले,परंतु कार्बन डेटिंग च्या माध्यमातून समजले की हे पुस्तक 1404-1438 च्या मध्ये लिहले गेले असावे .ह्याला जगातील सर्वात रहस्यमई हस्तलिखित ग्रंथ म्हणून ओळखले जाते. 2) क्रिप्टोज (Kryptos) क्रिप्टोज (Kryptos) चा अर्थ रहस्यमई ग्राफिय आहे .हे अमेरिकी आर्टिस्ट जीम सनबोर्ण द्वारे बनवलेली एक रहस्यमई एन्क्रिप्टेड मूर्तिकला आहे.ह्याला वर्जिनियच्या लैंग्ले सीआईए च्या हेडक्वार्टर च्या बाहेर आपण बघू शकतो.ही एक अशी रहस्यमई गोष्टा आहे जिला सोडवण्या साठि खूप जन आपले डोके फोडत आहेत.जीम च्या ह्या क्रिप्तोज च्या चार मेसेज पैकी तीन मेसेज ला सोडवण्यात यश आले आहे आणि चौथा रहस्य बनून राहिला आहे . 3) फैस्टोस डिस्क (Phaistos Disc) : ह्या डिस्क ची कथा तंतोतंत हॉलीवूड मूवी इडियना जोन्स च्या सारखी आहे . हिला इतलावी पुरातत्ववादी लुईगी पर्नियर ह्याने 1908 मध्ये शोधले होते.ही डिस्क मातीपासून बनवलेली आहे जिच्यात खूप सारे रहस्यमई चिन्ह बनवलेले आहेत हे चिन्ह अज्ञात हेरोग्लिफिक्स (hieroglyphics) चे प्रतिनिधित्व करते .हेरोग्लिफिक्स एक प्रकारची चित्र लिपि आहे.असा मानतात की ह्या डिस्क ल दुसरी सहस्राब्दी ईसा पूर्व मध्ये तयार केली होती.ही भाषा प्राचीन काळात उपयोगात आणली जात असे. 4) शगबोरोह इंस्क्रिप्शन (Shugborouh inscription) स्टेफॉर्डशायर स्थित हे 18 व्या दशकातील स्मारक लांबून बघितल्यावर निकोलास पौसीन ची चर्चित पेंटिंग आर्केडियन शेफेर्ड्स सारखं वाटते परंतु जवळून बघितल्यावर समजते की ह्या कलाकृतीवर पत्र DOUOSVAVVM च एक रहस्यमई अनुक्रम दिसून येतो. DOUOSVAVVM हा एक प्रकारचा कोड आहे ज्याला 250 पेक्षा अधिक काळ झाला आहे. परंतु अजून पर्यन्त ह्याला कोणी उलगडू शकले नाही... 5) तमम शड केस (Tamam Shud case): ह्या प्रकरणाला औस्ट्रेलियातील सर्वात रहस्यमई प्रकरण मानले जाते . हे प्रकरण डिसेंबर 1948 मध्ये एडिलेड मध्ये सोमरटेन समुद्री तटा वर मृत अवस्थेत सापडलेल्या मनुष्याच्या बाबतीत आहे .ह्या माणसाची कधीच ओळख कळलेली नाही आणि त्याही पेक्षा त्या मानसाच्या खिश्यात सापडलेल्या एका कागदाच्या तुकड्याचे रहस्य जास्त आहे,ज्यात " तमम शड " शब्दाचा उलेक्ख आहे.जेव्हा ह्या शब्दाचा अनुवाद केला तेव्हा समजले की ह्या शब्दांचा अर्थ "अंत" आहे.ह्या शब्दाचा उल्लेख उमर खय्यम च्या कवितेत केला गेलं आहे. 6) वाउ सिग्नल (Wow Signal) 1977 च्या उन्हाळ्याच्या दिवसातील गोष्ट आहे सर्च फॉर एक्सट्राटेरेस्ट्रियल­ इंटेलिजेंस (एसईटीआई) चे वॉलेंटियर जेरी एहमन असे पहिले व्यक्ति बनले ज्यांनी दुसर्‍या जगातील म्हणजे एलियन ने पाठवलेला संदेश प्रपता केला. एहमन तेव्हा अंतरीक्ष मधून आलेले संदेश स्कॅन करत होते त्यांना हा संदेश 72 सेकंड पर्यन्त प्रपता झाला त्यांनी जेव्हा मेजेरर्मेंट स्पाईक पहिले तर त्यांना जाणवले की हा संदेश कुण्या विद्वान एलियन द्वारे पाठवलेला आहे. जेव्हा ह्या प्रकरणाची तपासणी करण्यात आले तेव्हा समजले की हे सिग्नल अंतरीक्ष के सैगिटैरी तार्‍या जवळून आले होते . हा तारा 120 प्रकाश वर्ष दूर आहे पृथ्वी पासून आणि त्या ठिकाणी मानव असणे आशयकया होते.सिग्नलच्या प्रिंट आऊट वर WOW लिहून आले होत म्हणून तेव्हा पासून ह्या सिग्नल ला wow सिग्नल म्हणून ओळखण्यात येते .आणि पुन्हा असे सिग्नल कधीच मिळाले नाही . संकलन : -Rahul Matade स्रोत : The worlds unsolved mysteries_ lionel fanthorpe Worlds unsolvemystries. By abhay kumar dubey...
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel