मला नाही कळत लिखाणाचे सूत्र
काय गद्य अन् काय पद्य
लेखणी हातात घेऊन
मनाला बोचलेले थेट लिहून काढते
त्यातच मगं राग द्वेष प्रेम विरह
सगळं सगळं ओळीतच मांडते
विचारांचे डोंगर मग
डोक्यावर नाचत असतात
लिहिता लिहिता कोऱ्या पानावर
पडत असतात
सोसलेल्या त्या वेदना
उगाच सलत राहतात
पानांवर मांडताना मात्र
हृदयाला टोचतात
रात्रीच्या कातरवेळी सगळ्याच जखमा
उघड्या पडतात
त्यातूनच मग नव्या नव्या रचना
उदयाला येतात
अर्धे अधिक विचार स्वप्नातच
विरघळून जातात
हृदयस्पर्शी दुःख मात्र नेहमी
आठवणीतच राहतात
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.